Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलीच्या लग्नाची चिंता मिटली; सरकारची 'ही' योजना देणार ६४ लाख रुपये

मुलीच्या लग्नाची चिंता मिटली; सरकारची 'ही' योजना देणार ६४ लाख रुपये


मुलांच्या भविष्याची चिंता प्रत्येक पालकांना असते. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, शिक्षणासह अन्य अॅक्टीवीटीमध्ये त्यांना गोष्टी समजाव्यात. कोणतीही अडचण आल्यास मुलांना त्यातून सहज बाहेर काढता यावे.
त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कधीही पैशांची कमतरता भासूनये यासाठी प्रत्येक पालक धडपड करत असतात.
आई वडिलांना मुलांपेक्षा जास्त मुलींची चिंता सतावते. मुलींच्या लग्नासाठी हुंडा पद्धत बंद झाली असली तरी मुलीला संपूर्ण संसार सेट खरेदी करून दिला जातो. त्यामुळे अनेक खेड्यापाड्यांत आजही मुलींच्या लग्नात वडिलांना पैशांची मोठी चणचण भासते. त्यामुळे मुलींच्या लग्नात तुम्हालाही ६४ लाख हवे असतील तर आजपासूनच पैसे जमवण्यास सुरुवात करा.

केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना सर्वच गुंतवणुकदारांसाठी फार फायदेशीर आहे. या योजनेमार्फत तुम्ही तुमची चिमुकली लहान असल्यापासून पैसे भरण्यास सुरुवात केली तर, ती लग्नाच्या वयाची होईपर्यंत तुम्ही लखपती झालेले असाल. मुलींसाठी या योजनेमध्ये लग्नासह शिक्षणासाठीची देखील तरतुद आहे.

सुकन्या समृद्धी व्याजदर दर 3 महिन्यांसाठी निश्चित केला जातो. 8% व्याज एप्रिल ते जून 2023 साठी सुकन्या समृद्धी योजनेत नवीन व्याजदर  लागू करण्यात आले आहे. हा व्याजदर 8 टक्के इतका आहे. साल २०२३ पर्यंत या योजनेचा व्याज दर ८.२ टक्के आहे. साल २०२४ च्या व्याजरात अजून कोणताही बदल झालेला नाही.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलगी जन्माला आल्याबरोबर गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी लगते. यासाठी मुलीचे वय १० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तुमची मुलीचे वय १० वर्षांच्या आत असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो. एकून १५ वर्षे या योजनेत गुंतवणूक करावी लागते. जमा पैसे मुलीचे वय १८ झाल्यावर यातील मॅच्युरिटीच्या करमेतून ५० टक्के रक्कम तुम्हाला काढता येते. तसेच उर्वरीत रक्कम मुलीचे वय २१ वर्षे झाल्यानंतर मिळते.

मुलीच्या लग्नात ६४ लाख कसे मिळतील?

सुकन्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महिन्याला १२,५०० रुपयांचा हप्ता जमा करा. असे केल्याने एका वर्षात तुमचे १.५ लाख रुपये जमा होतील. जमा रकमेवर तुमच्याकडून कोणताही कर आकारला जात नाही. मॅच्युरिटीपर्यंत ७.६ टक्के व्याज दर जरी पकडला तरी यातून मोठी रक्कम उभी राहते. मध्ये या पैशांना हात न लावता थेट मुलगी २१ वर्षांची झाल्यावर पैसे काढल्यास ही रक्कम ६३ लाख ७९ हजार ६३४ रुपये इतकी होते. १२,५०० चा हप्ता अल्यास तुमच्याकडे आरामात ६४ लाख रुपये जमा होतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.