Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हा कुत्रा आहे सिंहापेक्षाही जास्त खतरनाक, जर चावला तर समजा हाडांचा झाला भुगा...

हा कुत्रा आहे सिंहापेक्षाही जास्त खतरनाक, जर चावला तर समजा हाडांचा झाला भुगा...


आपल्या घराच्या रक्षणासाठी कुत्र्यांची गरज असते, ते आक्रमक जातीचा कुत्रा पाळतात आणि ज्यांना फक्त जोडीदार म्हणून कुत्रा पाहिजे असतो ते सौम्य स्वभावाचे कुत्रे घरी आणतात. श्वानाच्या अशा जातीची माहिती घेऊ या, जिला साक्षात यमराजाचा अवतार म्हटलं जातं.

'अमेरिकन बुली डॉग्ज' असं या जातीचं नाव आहे. श्वानाची ही जात एवढी धोकादायक आहे की ते चावल्यास माणसाच्या मजबूत हाडांचाही चुराडा होऊ शकतो. आपल्या आकारमानासाठी प्रसिद्ध असलेले हे श्वान आक्रमकपणाबाबत पिटबुलपेक्षाही वरचढ आहेत. काही देशांमधल्या सरकारांनी श्वानांच्या या जातीवर बंदीही घातली आहे.

सिंहापेक्षाही बलवान

अमेरिकन बुली डॉग्ज हे पिटबुल्ससारखे दिसतात. त्यामुळे त्यांना ओळखण्यात चूक होऊ शकते. बुली डॉग्ज क्रॉस ब्रीडिंगमुळे जन्माला आले आहेत. असं म्हणतात, की या कुत्र्यांची उत्पत्ती किमान पाच वेगवेगळ्या जातींच्या श्वानांच्या संकरित प्रजननानंतर झाली आहे. ही मुळात एक शिकारी जात आहे आणि तिची शिकण्याची क्षमता खूप जास्त आहे. या श्वानांना योग्य प्रशिक्षण मिळालं नाही तर ते सिंहापेक्षाही धोकादायक ठरू शकतात. त्यांच्या चाव्यामुळे त्वचा आणि मांस फाटून हाडांचा चुरा होऊ शकतो. त्यांच्या हल्ल्याचा बळी ठरलेली व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकत नाही.

अत्यंत धोकादायक आहे ही जात

या जातीच्या श्वानांचा राग खूप धोकादायक असतो. काही वेळा ते आपला मालक किंवा केअर टेकरसाठीही धोकादायक ठरतात. स्टँडर्ड, पॉकेट, एक्सएल आणि क्लासिक हे अमेरिकन बुली डॉग्जचे चार प्रकार आहेत. यापैकी एक्सएल हा सर्वांत धोकादायक प्रकार आहे. त्यांची उंची 19 ते 23 इंच इतकी असते. क्लासिक श्वानांचा आकारही असाच असतो. पॉकेट प्रकारचे बुली डॉग्ज आकाराने सर्वांत लहान असतात. ते 13 ते 16 इंच उंचीचे असतात.

सप्टेंबर 2023मध्ये, ब्रिटनमधील बर्मिंगहॅममध्ये एका बुली डॉगने 11 वर्षांच्या मुलीला चावा घेतला होता. यानंतर ब्रिटनमध्ये या श्वानांवर बंदी घालण्याची मागणी होत होती. त्यानंतर याच जातीचा श्वान चावल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी तातडीची बैठक घेऊन या जातीच्या श्वानांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.