Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेडीसह पळालेल्या खुनातील संशयितास अखेर पकडले सांगली एलसीबीची कारवाई

बेडीसह पळालेल्या खुनातील संशयितास अखेर पकडले सांगली एलसीबीची कारवाई

सांगली :  शहरातील मध्यवर्ती कारागृहाच्या दारातून पोलिसांना हिसडा मारून बेडीसह पळून गेलेल्या खुनातील संशयितास पकडण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

लक्ष्मण आण्णा चौगुले (वय ३०, रा. विटा) असे त्याचे नाव आहे. चौगुले याला उपचारासाठी सांगली मुख्यालयातील पोलिस पुण्यातील ससून रूग्णालयात घेऊन गेले होते. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चौगुले याला घेऊन पथक सांगलीतील कारागृहाजवळ पोहोचले. त्यावेळी चौगुले याने पोलिसांच्या हाताला हिसडा मारून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. ही घटना घडल्यानंतर पोलिसांची विविध पथके त्याला शोधण्यासाठी रवाना करण्यात आली होती. 

त्याला पकडण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते. हे पथक त्याचा शोध घेत असताना पथकातील बिरोबा नरळे, विक्रम खोत यांना चौगुले हा कृष्णा नदी काठावरील जनावर बाजार परिसरात लपल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे धाव घेऊन परिसर पिंजून काढला. त्यावेळी तो तेथे अंधारात लपल्याचे दिसून आले. त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पोवार, बिरोबा नरळे, संदीप गुरव, अरूण पाटील, सागर लवटे, संदीप पाटील, विक्रम खोत, सोमनाथ गुंडे, रोहन घस्ते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.