Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्टार यशच्या आणखी एका चाहत्यांचा मृत्यू! कर्नाटकात भेटण्याचा प्रयत्न करत असताना कारला धडकला

स्टार यशच्या आणखी एका चाहत्यांचा मृत्यू! कर्नाटकात भेटण्याचा प्रयत्न करत असताना कारला धडकला


साउथचा सुपरस्टार अभिनेता यशला वेगळ्या ओळखीची गरज नाही. KGF Chapter 2 च्या यशानंतर, तो केवळ कन्नडमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात ओळखला जातो. यशची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. मात्र त्याचा हाच चाहता वर्ग त्यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे. 8 जानेवारीला यशच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना त्याच्या तीन चाहत्यांचा मृत्यू झाला. हा एक दुःखद अपघात होता. कट आऊट लावताना विजेचा धक्का लागल्याने यशच्या तीन चाहत्यांचा मृत्यू झाला होता.

या अपघातानंतर यशने मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. इतकेच नाही तर चाहत्यांना आपली काळजी घेण्याचे आवाहनही केले होते. मात्र त्यातच आणखी एक वाईट घटना घडली आहे. यशच्या आणखी एका चाहत्याचा कार अपघातात मृत्यू झाला.

मिडिया रिपोर्टनुसार, यशच्या एका चाहत्याचा अपघातात मृत्यू झाला. तो यशला कर्नाटकला भेटण्यासाठी जात होता. यादरम्यान कर्नाटकातील मुलगुंड येथे त्यांची दुचाकी पोलिसांच्या वाहनाला धडकली आणि हा अपघात झाला त्यांला तातडीने गडग इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.

निखिल गौडा भीमनगौडा गौडर असे त्याचे नाव होते. 22 वर्षीय निखिल बिनकडकट्टी गावातील रहिवासी होता. आत्तापर्यंत यशने या चाहत्याच्या निधनावर कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. मात्र बातमी यशसाठी नक्कीच धक्कादायक असणार आहे. यशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा KGF 2 मध्ये दिसला होता. आता चाहते KGF चॅप्टर 3 आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे दोन्ही भाग संपूर्ण भारतात ब्लॉकबस्टर ठरले.

आता तो लवकरच गीतू मोहनदासच्या टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन अप्स चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साई पल्लवी दिसणार होती मात्र आता यासाठी करीना कपूर खानच्या नावाची चर्चा आहे. यासोबतच तो नितीश तिवारी यांच्या 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.