Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चैतन्याश्रम’ या वृध्दाश्रमाचा भूमिपुजन समारंभ : आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते होणार

चैतन्याश्रम’ या वृध्दाश्रमाचा भूमिपुजन समारंभ : आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते होणार 


सांगलीः श्री ब्रह्मचैतन्य प्रतिष्ठान संचलित ‘चैतन्याश्रम’ या वृध्दाश्रमाचा भूमिपुजन समारंभ उद्या-शनिवारी सकाज़ी 10.30 वाजता आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती चैतन्याश्रमाचे अध्यक्ष प्रविण गोडबोले यांनी दिली.

 इनामधामणी रोडवर किल्लेदार फार्म हाऊसच्या पाठीमागील बाजूस आश्रमाच्या प्रशस्त जागेत  सर्व सुविधांनी असे चैतन्याश्रमाची नवीन वास्तू उभारण्यात येणार आहे. यावेळी ह.भ.प. गुरुनाथ कोटणीस, ह.भ.प. दिपक केळकर तसेच इनाम धामणीचे सरपंच अश्‍विनी कोळी, माजी नगरसेवक विनायक सिंहासने, युवराज गायकवाड, संजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.

गोडबोले म्हणाले,  मानवतेचा दृष्टीकोनातून सेवाकार्य करणे,जेष्ठांची सेवा करणे,वृध्दांची शारीरिक,मानसिक व वैद्यकीय काळजी,कुटुंब समुपदेशन करणे नवीन पिढीत वृध्दांप्रती कर्तव्याची जाणीव निर्माण करुन देणे यासाठी चैतन्याश्रम सुरु केले आहे. नव्या प्रस्तावीत चैतन्याश्रमाच्या भव्य वास्तूत पुरुष-महिलांसाठी स्वतंत्र सभागृह प्रशस्त किचन,डायनिंग व्यवस्था, यासह सर्व आवश्यक सुविधा असणार आहेत. जेष्ठांया विरंगुळ्यासाठी श्रीराम मंदिर, ग्रंथालय,गार्डन,मेडिटेशन हॉल,आश्रमासाठी स्वतंत्र गाडी, तसेच जेष्ठांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय सुविधांसाठी डॉक्टरांची सोय ही करण्यात आली आहे. चैतन्याश्रमाच्यावतीने  वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जातात. यात जेष्ठ नागरीक दिन,भजन,किर्तन,गायन,प्रवचन,सर्व धार्मिक सण, यासह अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.