Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पतीसोबत भांडल्यानंतर डॉक्टर पत्नीने पेटवलं घर; छत्रपती संभाजीनगरमधील थरारक घटना

पतीसोबत भांडल्यानंतर डॉक्टर पत्नीने पेटवलं घर; छत्रपती संभाजीनगरमधील थरारक घटना

छत्रपती संभाजीनगरमधून एक अजब घटना समोर आली आहे. पती-पत्नीचे भांडण झाल्याने संतापलेल्या पत्नीने रागाच्याभरात थेट घर पेटवलं आहे.घराला आग लावताच आगीन रौद्ररूप घेतलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतलीये.

इमारतीला लागली भीषण आग

ठाकरे नगर परिसरात ही अजब घटना घडली आहे. घटनेतील पती-पत्नी पेशाने डॉक्टर आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं आहे. वेळीच आगीवर नियंत्रण आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अन्यथा संपूर्ण इमारत पेटण्याची शक्यता होती. सदर घटनेत घरातील सर्व सामान जळून खाक झालं आहे.

पती-पत्नीच्या नात्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद, रुसवे-फुगवे सुरूच असतात. यामध्ये आजवर पतीने-पत्नीला मारहाण केल्याचे किंवा पत्नीने-पतीला मारहाण केल्याचे फनी व्हिडीओ पाहिले असतील. काही घटनांमध्ये तर हत्येचा कटही रचला जातो. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना फारच अजब आहे. भांडण झालेली महिला स्वत: एक डॉक्टर असूनही तिने असं टोकाचं पाऊल उचललं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.