Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहीष्कार

मराठा सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहीष्कार


मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याकरीता जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांना अशैक्षणिक कामात जुंपल्यामुळे शिक्षक तक्रार निवारण समीती च्या वतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात आज २३रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत बहीष्कार नोंदविण्यात आला.

दहावीच्या सराव परीक्षा सुरू आहेत व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहे त्यामुळे बहुतांश शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करण्यात व विद्यार्थ्यांची उजळणी घेण्यात व्यस्त आहे असे असताना बहुतांश शिक्षकांना नमूद सर्वेक्षण करण्याबाबतचे आदेश प्राप्त झालेले आहेत त्यामुळे सर्वेक्षण करतांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होणार आहे. सर्वेक्षण 23 ते 31 जानेवारी ह्या कालावधीत पूर्ण करण्याबाबत नमूद करण्यात आलेले आहे. दरम्यानच्या काळातच गणतंत्र दिनाचा उत्सव साजरा करावयाचा आहे, बहुतांश शाळेतील शिक्षक गणतंत्र दिनाच्या उत्सवाच्या तयारीत आहे तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत शिक्षक व्यस्त आहेत अशा असतांना सर्वेक्षणा पेक्षा गणतंत्र दिनाची तयारी व मराठा सर्व्हे शासनाच्या उपक्रमाचे महत्त्व नाही का? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.

100 कुटुंबीयांचा 185 प्रश्नांचा फॉर्म सात दिवसात पूर्ण करायचा आहे ,एक कुटुंबाकरीता जवळपास 45 मिनिटे इतका कालावधी लागणार आहे मग शाळा पूर्ण करून नमूद कालावधीत सर्वेक्षण पूर्ण करणे शक्य नाही ,शाळा पूर्ण बंद ठेवायच्या का? व शाळा सात दिवस बंद ठेवल्या तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय?असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांची नियुक्ती अध्यापनाकरीता झालेली असतांना शिक्षकांची मूळ काम बाजूला सारल्या जात असून इतरच अशैक्षणिक कामे सातत्याने शिक्षकांकडून करून घेतल्या जात आहे, त्यामुळे Maratha survey मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडत चाललेले आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे त्यामुळे बहिष्काराची भूमिका घ्यावी लागत असल्याचे अजय भोयर यांनी कळविले.

यावेळी धनराज कावटे,अनिल टोपले,कुंडलिक राठोड, पुंडलिक नागतोडे,मुकेश इंगोले,गणेश मानकर,एस पी सावदे, आर पी घोडे, सौ मेश्राम ,एन जे सोळंके ,एस एस लव्हाळे, जी व्ही वैद्य, ए आर इंगोले, अजय पिसुट्डे ,अजय गावंडे ,अजय सावरकर, डी व्ही कुकडे, एस बी बिजवे ,एम एस मिश्रा ,के ए महाजन,रिठे, वानखेडे, एस एस नाखले, आर जी मिश्रा, शेषराव पाटील ,वानखेडे, सौ भगत, सौ पुनसे, रेणुका रपाटे ,पल्लवी वखरे पराग वाघ, एन डी मिर्जापुरे, एच डी शेळके, मोरे , राधा दुबे इंगळे ,रहीम शहा,संतोष महाजन सह मोठ्या संख्येत शिक्षक उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.