हाताने कचरा खाली टाकला, पुन्हा केली स्वच्छता; भाजपा आमदाराचा व्हिडिओ व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशभरातील मंदिर स्वच्छ करण्यासाठी भाजपा नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार आणि कार्यकर्ते स्थानिक मंदिरात जाऊन स्वच्छता करत आहेत. मोदींनी नाशिकमधील काळा राम मंदिरात जाऊन स्वच्छता केली, त्यानंतर मकर संक्रात ते २२ जानेवारी म्हणजे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापर्यंत मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन देशवासीयांना केल होते. त्यानुसार, देशभरात ही मंदिर स्वच्छता मोहिम सुरू झाली असून अनेक नेतेमंडळी यात सहभागी होत आहेत. त्यातच, एका भाजपाआमदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भाजपा नेत्यांकडून मंदिर स्वच्छता मोहिम जोरदारपणे सुरू असून या स्वच्छता मोहिमेचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील मुंबादेवीच्या मंदिरात जाऊन स्वच्छता केली. तर, माजी क्रिकेटर आणि खासदार गौतम गंभीरनेही दिल्लीतील करोलबाग मंदिरात जाऊन साप सफाई केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला आहे. आता, याच मोहिमेत गुजरातमधील एका भाजपा आमदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, हे महाशय एका हाती झाडू घेऊन स्वच्छता करताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या हातातून कचरा जमिनीवर टाकतानाही दिसून येतात. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, येत्या निवडणुकीत जनता तुमचा कचरा साफ करेल हे लक्षात ठेवा, असा टोलाही भाजपाला लगावला आहे.
''स्वत:च्या घरी तरी कधी कचरा काढला होतात का राव ? इकडे वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी साहेब कचरा काढतायत, काय वेळ आलीये यांच्यावर! अरे...जनता मूर्ख नाही रे…प्रत्येक वेळेला तुम्ही फोटो काढणार आणि मिडियाला आणणार. येत्या निवडणुकीत जनता तुमचा कचरा साफ करेल हे लक्षात ठेवा''. सब गंधा है पर धंदा है.... असेही राष्ट्रवादीने ट्विटरवरुन म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.