सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचं निधन: पोलीस दलात खळबळ
शहर पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे अशोक धुमाळ यांचं निधन झालं आहे. अशोक धुमाळ यांच्या मृत्यूने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी इमारतीवरून खाली पडल्याने त्यांना भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. घरी असताना आज त्यांची प्रकृती अस्थिर झाली होती. दुपारी उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांना आणण्यात आलं. यावेळी प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलं होतं. रात्री अशोक धुमाळ यांच्या शरीराने उपचारास प्रतिक्रिया देण्याचे बंद केले होते. रात्री ९.३० दरम्यान त्यांचं निधन झाले. अशोक धुमाळ यांच्या पश्चात पत्नी, एका मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
यापूर्वी कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि टोळीला मोक्का गुन्ह्यातून जामीन मिळाल्याने अशोक धुमाळ चर्चेत आले होते. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आंदेकर टोळीला मोक्का गुन्ह्यातून जामीन मिळाला, असा खोचक टोला कोर्टाकडून लावण्यात आला होता. गुंड बंडू आंदेकर आणि टोळीला मोक्का गुन्ह्यातून जामीन मिळाला, या कारणावरून अशोक धुमाळ अस्वस्थ असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जातं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.