Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद मोहोळ खून प्रकरणी मोठी अपडेट; 'या' धडाकेबाज अधिकाऱ्याकडे तपासाची जबाबदारी

शरद मोहोळ खून प्रकरणी मोठी अपडेट; 'या' धडाकेबाज अधिकाऱ्याकडे तपासाची जबाबदारी

कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या हत्येनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आठ आरोपींना जेरबंद केलं. त्यानंतर ही हत्या 10 वर्षांपूर्वीच्या वैमनस्यातून केली असल्याचा खुलासा आरोपींनी केला असला तरी पोलिस मात्र या प्रकरणाच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांकडून या हत्याप्रकरणाची पाळंमुळं खणून काढण्यात येत आहेत. यामध्ये दररोज नवीन वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा होत आहे.आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.

पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा भागात शुक्रवारी (ता. 5) दुपारी गुंड शरद मोहोळ याची निर्घृण हत्या करण्यात आली. चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्याने एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर मोहोळला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्याला मृत घोषित केले गेले. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे  पोलिसांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि आठ आरोपींना ताब्यातही घेतलं आहे.आता या प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे देण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे. मोहोळ खून प्रकरणात आणखी कितीजण सहभागी आहेत, तसेच मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येणार आहे.पोलीस आयुक्त रितेश कुमार  यांनी मोहोळ खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश मंगळवारी दिले.

प्राथमिक तपासात मोहोळचा खून आर्थिक, तसेच जमीन व्यवहारातील वादातून झाल्याचे उघडकीस आले आहे. मुख्य सूत्रधार आरोपी पोळेकर याचा नामदेव कानगुडे याचा मामा आहे. नामदेवचा मोहोळने अपमान केला होता. अपमानाचा बदला घेण्यासाठी पोळेकरने खून केला. पोळेकरला पिस्तूल खरेदीसाठी आर्थिक मदत कोणी केली, तसेच मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे.

जमिनीच्या वादातून साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी शरद मोहोळचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान यांना अटक करण्यात आली आहे. कोथरुड पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.