सांगलीत शालेय विद्यार्थ्यावर वर्गमित्राचा कोयत्याने हल्ला
शहरातील हरभट रस्त्यावरील आरवाडे हायस्कूलमध्ये एका शालेय विद्यार्थ्यांवर वर्गमित्रानेच कोयत्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केले. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेत ही घटना घडली. किरकोळ कारणातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, असे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
सलमान जावेद मुल्ला (वय १४, रा. शंभर फुटी रस्ता, सांगली) असे जखमीचे नाव आहे. जखमी सलमान मुल्ला हा कुटुंबासह शंभर फुटी रस्ता परिसरात राहतो. त्याचे वडिल सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. सलमान आरवाडे हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकतो. आज नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला होता. संशयित हल्लेखोर त्याचा वर्गमित्र आहे. त्यांच्यात पुर्वीपासून किरकोळ कारणातून वारंवार भांडण होते.
दोन दिवसापुर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. संशयिताने आज शाळेत येताना दप्तरातूनच छोटा कोयत्यासारखे धारधार हत्यार आणले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हल्लेखोराने हत्यार काढले. थेट सलमान यांच्यावर हल्ला केला. त्यात मानेवर आणि हातावर गंभीर इजा झाली.ही घटना घडल्यानंतर खळबळ उडाली. शाला प्रशासनाने तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री उशीरा त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या प्रकृतित सुधारणा होत आहे. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.