Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाळेत शिकत असतानाच मुलं आत्महत्या करतील; खोत यांची मंत्री केसरकरांवर खोचक टीका

शाळेत शिकत असतानाच मुलं आत्महत्या करतील; खोत यांची मंत्री केसरकरांवर खोचक टीका

आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश केला जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली होती. दिपक केसरकर यांच्या या निर्णयाला महायुतीमधीलचं शेतकरी नेत्यांनी विरोध केला आहे. या निर्णयावरुन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिपक केसरकरांवर टीका केली आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

"शेती करताना बाप आत्महत्या करत आहे. आता मुलं शाळेत शिकत असतानाच आत्महत्या करतील याच उद्देशाने दीपक केसरकर यांनी शालेय शिक्षणात शेती हा विषय घेण्याचा घेण्याचा विचार केला असावा," अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केसरकर यांच्यावर केली आहे.

तसेच "शेतकऱ्यांच्या मुलांना शेती शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे शेतीचा विषय शिक्षणात घेऊ नका. या निर्णयाला आमचा विरोध आहे. त्याऐवजी शेतमालाला भाव कसा मिळेल हा विषय अभ्यासक्रमात घ्यावा," अशीही मागणीही त्यांनी केली.


लोकसभा लढवण्याचीही व्यक्त केली इच्छा...

दरम्यान, यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी महायुतीतून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून हातकणंगले लोकसभेची जागा रयत क्रांतीला देण्याची मागणी केली आहे. मात्र सदाभाऊ खोत यांच्या या मागणीने शिंदे गटाचे टेंन्शन चांगलेच वाढले आहे. कारण सध्या शिंदे गटाचे धैर्यशील माने हे याठिकाणी खासदार आहेत.

मागच्या वेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मशागत मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र हा गडी (खासदार धैर्यशील माने )चांगला पेहराव करून आला आणि आम्ही केलेल्या मशागतीचा फळ घेऊन गेला, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.