Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तब्बल ११ दिग्गजांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी; आगामी निडणुकीत बसणार मोठा धक्का

तब्बल ११ दिग्गजांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी; आगामी निडणुकीत बसणार मोठा धक्का

मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे कारण आता काही महिन्यांनंतर लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरांसारख्या बड्या नेत्याचा पक्ष सोडल्यास काँग्रेसचे मोठे नुकसान होऊ शकते.

कपिल सिब्बल

माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सिब्बल यांनी १६ मे २०२२ रोजी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता. नंतर त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेचे खासदार म्हणून अर्ज दाखल केला.

गुलाम नबी आझाद

गुलाम नबी आझाद यांनी २०२२ मध्ये पक्षाचा राजीनामा दिला होता. त्या काळात पक्ष सोडणाऱ्या सर्वात मोठ्या नेत्यांपैकी ते एक होते. २०२२ मध्ये पक्षाने तोंड दिलेला हालक्षणीय राजीनामा होता. गुलाम नबी आझाद यांनी आता जम्मू-काश्मीरमध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी या नावाने स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे.

हार्दिक पटेल

गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी मे २०२२ मध्ये राहुल गांधींना नाराज करून राजीनामा पत्र देऊन काँग्रेस सोडली होती. हार्दिक पटेल यांनी राजीनामा पत्रात लिहिले होते की, पक्षातील बहुतांश बडे नेते त्यांच्या फोनमध्ये व्यस्त असतात. राजीनामा पत्रानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

अश्विनी कुमार

माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांनी पंजाब निवडणुकीच्या काही दिवस आधी फेब्रुवारी २०२२ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता. अश्विनी कुमार हे २०१९ च्या निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष सोडणाऱ्या पहिल्या नेत्यांपैकी एक होते.

सुनील जाखड

पंजाब काँग्रेस युनिटचे नेतृत्व करणारे सुनील जाखड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर टीका केल्याबद्दल नेतृत्वाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी पक्ष सोडला होता. ते मे महिन्यात भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांना भाजप पंजाब युनिटचे प्रमुख बनवण्यात आले.

आर पी एन सिंग

माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंग जानेवारी २०२२ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी असे करणारे ते सर्वात प्रमुख नेते ठरले. एक प्रमुख मागास नेते असलेल्या सिंह हे प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखालील यूपी प्रचारात डावलले गेल्याने संतप्त होते.


ज्योतिरादित्य सिंधिया

सध्या केंद्रीय मंत्री असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २०२० मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्या काळात मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले, त्यामुळे कमलनाथ सरकार पडलं.

जितिन प्रसाद

माजी केंद्रीय मंत्री आणि राहुल गांधी यांचे निकटवर्ती जितिन प्रसाद यांनी २०२१ मध्ये काँग्रेस सोडली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या काळात ते उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे सर्वोच्च ब्राह्मण चेहरा होते.

अल्पेश ठाकोर

माजी आमदार अल्पेश ठाकोर यांनी जुलै २०१९ मध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान केल्यानंतर पक्ष सोडला होता. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राधापूरची पोटनिवडणुक लढवली. परंतु त्यांचा पराभव झाला. मात्र, गेल्या वर्षी ते गांधीनगर दक्षिणमधून विजयी झाले होते.

अनिल अँटनी

माजी केंद्रीय मंत्री एके अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी गेल्या वर्षी जानेवारीत पक्ष सोडला आणि पुढच्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. भारताला विकासाच्या वाटेवर नेण्याची अत्यंत स्पष्ट दृष्टी असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.