Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील हिवताप कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; पी.एन.काळे

राज्यातील हिवताप कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; पी.एन.काळे


सांगली:  राज्यातील हिवताप विभागात काम करणाऱ्या आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक यांच्या पदोन्नतीचा आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ केवळ दिं  29 सप्टेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेमुळे मिळालेला नव्हता. या अन्यायकारक अधिसूचनेमध्ये शासनाने सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल केलेला होता. वास्तविक 29 सप्टेंबर 2021 नंतर शासन सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन सेवा प्रवेश नियम लागू करणे अपेक्षित होते. 

तसे न करता जुन्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तेच नियम लागू केल्याने संघर्ष निर्माण झालेला होता. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम हिवताप कर्मचाऱ्यांना मोठा अन्याय सहन करावा लागला होता.   या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे व राज्यसरचिटणीस  पी एन काळे यांच्या कार्यकारिणीने  पुणे, मुंबई येथे लाक्षणिक उपोषणे, निदर्शने, मंत्री महोदयासोबत मंत्रालयीन पातळीवर सभांचे आयोजन करून ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिली.  

अधिसूचनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या हिताचा बदल झाला आणि ती अधिसूचना मा. मिलिंद म्हैसकर शासनाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या स्वाक्षरीने दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी योग्य त्या बदलासह प्राप्त झाली.  आणि त्यामुळे अडीच वर्ष वर्षापासून पदोन्नती आणि आश्वासित   योजनेपासून वंचित असलेल्या राज्यातील हिवताप कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या परिमंडळातील हिवताप कर्मचाऱ्यांना तात्काळ पदोन्नती मिळावी यासाठी मा.डॉ योगेश साळे, सहाय्यक संचालक  कोल्हापूर यांना भेटून राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे यांनी विनंती केली.  

वास्तविक सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करून विज्ञान शाखेचा पदवीधर किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असणाऱ्या उमेदवारांना पदोन्नती संधी उपलब्ध होईल किंवा सेवा प्रवेश मिळेल अशा प्रकारची अट शासनाने पाच वर्षासाठी शिथिल केलेली आहे. ही बाब कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंददायी आनंददायक आहे. या निर्णयामुळे राज्यातील हिवताप कर्मचाऱ्यांचे  पदोन्नती चा मार्ग मोकळा झाला आहे. दहा वीस तीस या आश्वासित प्रगती योजनेचा लाभही लवकरच  मिळणार आहे. अशी माहिती राज्य सरचिटणीस पी.एन.काळे यांनी दिली. या प्रसंगी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नितीन कांबळे, प्रणव जाधव, शिवाजी बर्गे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.