Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगप्रसिद्ध रांगोळी कार आदम अली मुजावर. प्रभू रामचंद्रांची विश्वविक्रमी रांगोळी

जगप्रसिद्ध रांगोळी कार आदम अली मुजावर.  प्रभू रामचंद्रांची विश्वविक्रमी रांगोळी


वाळपई गोवा येथे शंभर बाय पन्नास फुटाची विश्वविक्रमी रांगोळी आदम अली मुजावर व त्यांचे सहकारी रेखाटन करणार गोवा राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे साहेब यांनी त्यांना आमंत्रण दिले आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या प्रभू रामचंद्र मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी ही रांगोळी रेखाटली जाते. अकरा तारखेला ही रांगोळी रेखाटन करण्यास सुरुवात होणार आहे व 14 तारखेला ही रांगोळी पूर्ण केली जाणार आहे. प्रभू रामचंद्रांचे चित्र हे 80 फुटाची असून प्रभुंचा चेहरा 14 फुटाचा आहे. चार्ट रांगोळी व 200 किलो विविध रंगाचा वापर करण्यात येणार आहे. या चित्रासाठी स्पेशल रांगोळी वापरण्यात येणार असून विविध रंगाच्या दीडशे ते दोनशे छटा वापरण्यात येतील प्रभू रामचंद्रांची उभारलेले चित्र असून प्रभूंच्या पायथ्याजवळ अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिराची प्रतिकृती रांगोळीतून रेखाटण्यात येणार आहे. 

रांगोळी पूर्ण झाल्यानंतर विधिवत पूजा करून रांगोळी सर्वांना पाण्यासाठी खुली केली जाणार आहे. रांगोळी रेखाटन करण्याची सुरुवात गोव्याचे आरोग्यमंत्री आदरणीय विश्वजीत राणे साहेब व जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा सुमित दादा कदम साहेब व मान्यवर हे करणार आहेत. रांगोळी रेखाटन करण्यासाठी. जगप्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर सुरेश छत्रे दत्ता माघाडे सुट्टीभाई कुडचे अभिजीत सुतार व त्यांचे सहकारी करणार आहेत.. ही रांगोळी पूर्ण झाल्यानंतर. 

भारतीय उच्च संस्कृतीचा शिरोबिंदू म्हणून. वर्ल्ड रेकॉर्ड बुकामध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही रांगोळी विशेष आहे व भारतीय संस्कृतीची ओळख आहे. विशेष बाब म्हणून ही रांगोळी दुकानांमध्ये नोंद व्हावी असा प्रयत्न केला जाणार आहे. जागतिक पातळीवरील बुक्काशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यामधील लिमका बुक एशिया बुक इंडिया बुक ग्लोबल बुक. इंटरनॅशनल बुक वर्ल्ड बुक हाय रेंज बुक मार्व्हल्स बुक गोल्डन बुक अशा विविध लोकांची संपर्क साधण्यात आला आहे. विशेष रांगोळी म्हणून याची दखल घेऊन नोंद व्हावी अशी विनंती करण्यात आली आहे. अदम अली मुजावर हे मुस्लिम धर्मे असूनही त्यांनी प्रभू रामचंद्राची रांगोळी काढण्याची आव्हान स्वीकारले आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक महामानवांच्या विश्वविक्रमी रांगोळ्या रेखाटले आहेत. अनेक वर्ल्ड बुक मध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता जिजाऊ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महात्मा ज्योतिबा फुले. एपीजे अब्दुल कलाम.. 

सहकाऱ्यांच्या बरोबर त्यांनी शिवराज्याभिषेकाची पाचशे फुटाची रांगोळी रेखाटन 80 सहकाऱ्यांच्या बरोबर विश्वविक्रम नोंदवला होता. कोरोना काळात पेंटिंग विकूनo त्यांनी 51 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधी दिला आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर ते म्हणतात की मी भारतीय असल्याचा मला खूप अभिमान आहे. कोणती जात धर्म भेद पंत मी  मानत नाही.. मानवता हाच धर्म मला खूप आवडतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.