Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत 'थर्टी फस्ट'ला ११० तळीरामांवर कारवाई ३५ जणांवर खटले; नियम मोडणाऱ्या ५४० जणांना दंड

सांगलीत 'थर्टी फस्ट'ला ११० तळीरामांवर कारवाई ३५ जणांवर खटले; नियम मोडणाऱ्या ५४० जणांना दंड


सांगलीत 'थर्टी फस्ट'ला ११० तळीरामांवर कारवाई ३५ जणांवर खटले; नियम मोडणाऱ्या ५४० जणांना दंड

जिल्हा पोलिस दलाकडून 'थर्टी फस्ट'च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली होती. पहाटे तीन वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात होता. जिल्ह्यात तब्बल ११० तळीरामांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३५ जणांवर सांगली वाहतूक शाखेने कारवाई केली. सर्व तळीरामांची वाहने जप्त करत त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. तसेच वाहतूकीचे नियम मोड़णाऱ्या ५४० जणांवर एका दिवसात कारवाई झाली. त्यांना तब्बल ६ लाख ४२ हजारांचा दंड ठोठावण्यात आला

'थर्टी फस्ट'निमित्त पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर अधीक्षक रितू खोकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. सायंकाळी जिल्ह्यात ११० जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघनासह बेदरकार वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आला. त्यात ५४० जणांचा समावेश आहे. त्यांना ६ लाख ४२ हजारांचा दंड आकारण्यात आला. दरम्यान, वाहतूक शाखेकडून ३५ तळीरामांसह १८१ जणांवर कारवाई करण्यात आली. अडीच लाखांचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी मागील प्रलंबित पन्नास हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.