Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

१३६ लाभार्थीना २ कोटी कर्ज वितरण

१३६ लाभार्थीना २ कोटी कर्ज वितरण 


सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका   अंतर्गत दी.अ.यो राष्ट्रीय नागरि अभियान योजनेची अंमलबजावणी मा आयुक्त तथा प्रशासक श्री . सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली , प्रकल्प अधिकारी  तथा उप आयुक्त सौ स्मूर्ती   पाटील यांच्या नियंत्रण खाली  सुरू आहे. 

सदर योजनेअंतर्गत स्वयंरोजगार घटकाखाली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या गरीब गरजू छोटे व्यावसायिक यांना बँकामार्फत दोन लाख वैयक्तिक कर्ज देण्यात येते तसेच या योजनेअंतर्गत स्थापन बचत गटांना कमाल दहा लाखापर्यंत व्यवसायिक कर्ज देण्यात येते. आज या योजनेअंतर्गत बँक ऑफ बडोदा मिरज शाखा यांनी या आर्थिक वर्षात एकूण 26 लाभार्थ्यांना कर्ज वितरित केले असून 49 लाख इतकी रक्कम आहे.

तसेच विदर्भ कोकण ग्रामीण बँक सांगली यांनी आज अखेर 113 लाभार्थ्यांना 1कोटी 87 लाख कर्ज वितरित केले आहे. सदर कामगिरी उल्लेखनीय असून योजनेच्या शहर प्रकल्प अधिकारी तथा उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते दोन्ही बँकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच मिरज विभागातील दहा बचत गटांना प्रत्येकी पाच लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले.  यावेळी मुख्य प्रबंधक नीरज कुमार विदर्भ कोकण बँकेचे मोसिन शिरगुप्पे प्रकल्प व्यवस्थापक मतीन अमिन ज्योती सर्वदे, किरण पाटील समूह संघटक शाहिन शेख, वंदना सव्वाखंडे व  स्टाफ उपस्थित होते



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.