Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपने घेतला खासदार संजयकाकांशी पंगा?

भाजपने घेतला खासदार संजयकाकांशी पंगा?



विटा : सांगलीतील खानापूर तालुक्यातील पळशी येथे ‘नमो केसरी’ या नावाने भव्य राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धा होत आहेत. या कुस्ती स्पर्धा सांगली शहर जिल्हा तालिम संघाच्या मान्यतेने आमदार गोपिचंद पडळकर आणि भाजपा युवा मोर्चा यांच्यावतीने आयोजित करण्यात येत आहेत.

मात्र याबाबत आज (दि.२१) गावागावात लावण्यात आलेल्या आणि वाटण्यात येणाऱ्या पोस्टर्समधून खासदार संजयकाका पाटील यांचा फोटो गायब आहे.

संबंधित पोस्टरवर पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे, निशिकांतदादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर, सुहास पाटील, अनिल पाटील आदींच्या नावासह अगदी संयोजक पैलवान सत्यजित पाटील यांचा सुद्धा फोटो आहे. मात्र जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय पाटील यांचे नाव आणि फोटो नेत्यांच्या फोटोमधून गायब झाला आहे. ही कशाची सुरुवात आहे? सांगलीची खासदारकी जिंकायची असेल तर संजयकाकांशी उघड उघड पंगा घेतल्याशिवाय विजयाचा दंगा आपल्याला करता येणार नाही. हे लक्षात घेऊन भाजपने संजयकाकांना बाजूला करायला सुरुवात तर केली नाही ना? अशी जोरदार चर्चा खानापूर तालुक्यात सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.