Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एका चार्जिंगमध्ये ५० वर्ष चालणारी बॅटरी; कुठे तयार होत आहे जाणून घ्या…

एका चार्जिंगमध्ये ५० वर्ष चालणारी बॅटरी; कुठे तयार होत आहे जाणून घ्या…

आपण सकाळी घरातून बाहेर जाताना एकदा फोन चार्ज केला की तो फक्त अर्धा दिवस किंवा तुमचा वापर कमी असल्यास संध्याकाळपर्यंत काम करतो. मात्र, १५-२० टक्क्यांवर आलेल्या फोनची बॅटरी फूल करण्यासाठी, त्याला पुन्हा चार्जिंगला लावावे लागते. मात्र, ‘एकदा चार्ज केलेला फोन किंवा बॅटरी, अखंड ५० वर्षांपर्यंत काम करत राहील’ असे तुम्हाला कुणी सांगितले तर? तुमचा एक तर त्यावर विश्वास बसणार नाही किंवा तुम्ही समोरच्याला काहीही बडबडतोय, असे म्हणून त्याच्याकडे लक्ष देणार नाही. मात्र, चीनमधील एका स्टार्टअप कंपनीने खरंच अशा जबरदस्त बॅटरीचा शोध लावलेला आहे, अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते. त्यानुसार, ‘बेटावोल्ट [Betavolt] नावाच्या या चिनी स्टार्टअप कंपनीने, न्यूक्लियर म्हणजेच अणुऊर्जेचे तंत्रज्ञान वापरून नाण्याच्या आकाराची एक बॅटरी बनवली आहे, असे बेटावोल्ट कंपनी सांगते.

खरंच हा आविष्कार किंवा शोध म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाच्या दिशेने अजून एक पाऊल आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. न्यूक्लियर म्हणजे अणुऊर्जेसारखी मोठी ऊर्जा एखाद्या नाण्याइतक्या लहानश्या जागेमध्ये बसवणे ही स्पेस आणि न्यूक्लियर तंत्रज्ञानात खूपच मोठी गोष्ट आहे. “बेटावोल्ट ॲटोमिक एनर्जी बॅटरीजमध्ये भरपूर वेळ काम करण्याची प्रचंड ताकद आहे. त्यामुळे तिचा अनेक उपकरणांमध्ये उपयोग केला जाऊ शकतो. ऐरोस्पेस [aerospace], AI साधने, वैद्यकीय उपकरणे, मायक्रोप्रोसेसर्स, प्रगत सेन्सर्स, तसेच लहान ड्रोन्स आणि मायक्रो रोबोट्स यांसारख्या सर्व यंत्रांमध्ये या बॅटरीची मदत होऊ शकते”, असे या कंपनीचे म्हणणे आहे. अशा या शक्तिशाली बॅटरीच्या प्रोटोटाइपवर सध्या चाचणी सुरू असून, लवकरच आपल्या फोनमध्ये किंवा अगदी ड्रोनमध्ये ही बॅटरी बसवली जाऊ शकते. यामुळे भविष्यात बॅटरीचा काम करण्याचा दर्जा प्रचंड वाढणार आहे.


मात्र, यामध्ये अणुऊर्जा वापरली असल्याने तुम्हाला ही बॅटरी कितपत सुरक्षित असू शकते, असा प्रश्न पडला असेल. तर या बॅटरीच्या लेयर्ड रचनेमुळे ती पेट घेणार नाही. ही बॅटरी फायर रेझिस्टंट असल्याने उष्ण किंवा थंड अशा अगदी कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेऊन त्यामध्ये काम करू शकते. त्यामुळे आता प्रत्यक्षात ही बॅटरी खरंच इतका वेळ काम करेल की नाही हे पाहण्याची उत्सुकता आहे. अगदी काही नाही तर निदान थोड्या वर्षांसाठी जरी बॅटरी टिकून राहिली, तरीही स्मार्टफोन बॅटरीजच्या क्षेत्रात भरपूर प्रगती होऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे असल्याची माहिती, न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.