Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षणानंतर आर्थिक क्षेत्रात कर्मवीर पतसंस्थेने आण्णांचे नांव मोठे केले :-मा.आ.डॉ.विश्वजीत कदम

शिक्षणानंतर आर्थिक क्षेत्रात कर्मवीर पतसंस्थेने आण्णांचे नांव मोठे केले :-मा.आ.डॉ.विश्वजीत कदम

शाखा वसगडे चे प्रशस्त आधुनिक वास्तुत स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी काढले गौरवोद्वारे वसगडे कर्मबीर आण्णांनी शैक्षणिक कार्य रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभे केले, रयत ने त्यांचे शैक्षणिকা कार्य पुढे नेले. त्यानंतर महाराष्ट्रात कर्मवीर पतसंस्था सांगलीने आर्थिक क्षेत्रात आण्णांच्या नावाने पतसंस्था स्थापली व उत्तुंग कार्य करून आण्णांचे नांव आर्थिक क्षेत्रात पुढे नेण्याचे महनीय कार्य केले आहे. त्याला तोड नाही असे भार्यात्कट उद्वार मा. आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी काढले. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली च्या बसगडे ता. पलुस येथील शाखेचे प्रशस्त वास्तुत स्थलांतर मा आ.डॉ. विश्वजीत कदम यांचे अमृताहस्ते नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.


कर्मवीर पतसंस्थेने जवळपास सात लाख लोकां चे जीवन उजळवण्याचे कार्य केले आहे. संस्थेची प्रगती पहाता संरखेला महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र देखील अपुरे पडेल या प्रगतीच्या चढत्या आलेखामुळे कर्मवीर पतसंस्था राज्यात नव्हे तर देशात आदर्श म्हणून पुढे येईल असा आशावाद प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले संस्था करीत असलेल्या कार्यामध्ये अर्थकारण, प्रगती, तंत्रज्ञान, ग्राहकसेवा, समाजसेवा या कार्याचा आढावा त्यांनी घेतला, सांगली कोल्हापूर सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात संस्थेच्या ६ शाखा कार्यरत असून मंस्थेची सभासद संख्या ६,३००० इतकी आहे. संस्थेचे सभासद ठेवीदार, कर्जदार, सेवक या सर्वांचे मिळून ७ लाख लोकां चे हे कुटूंय बनल्याचे त्यांनी नमुद केले. सभासदांच्या विश्वासावर संस्थेने रु.१०२० कोटीच्या देवी गोळा आहेत. तर रु ७९५ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. कामकाज करीत असताना संस्थेने सभासद, कर्जदार, सेवक यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून ते पतसंस्था क्षेत्रात वेगळेपण निर्माण करणारे आहेत असे श्री. रावसाहेव पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात नमुद केले.

यावेळी श्री. रावसाहेब पाटील यांच्या हस्ते आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला, यावेळी वसगडे शाखेचे सल्लागार श्री नसरगोडा भाऊ पाटील, श्री अरविंद आणणा पाटील, श्री. अमोल राजगोंडा पाटील, श्री. नेमगोंडा राजगोंडा पाटील, श्री सचिन आण्णासी पाटील, श्री. अजित वावगोंडा पाटील, श्री. मुदर्शन मुरेश मद्वाण्णा, श्री नारायण जगन्नाथ कुलकर्णी यांचा सह मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अनिल मगदुम, विभागीय अधिकारी श्री अशोक राजोबा, शाखाधिकारी श्री. अभिजीत कदम यांचा सत्कार मा. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी बसगडे गावच्या वतीने मा. आमदार यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास वसगडे चे सरपंच सौ. वृशाली गजानन काशिद, उपसरपंच श्री अनिल आदगोंडा पाटील, ब्रम्हनाळचे सरपंच सौ. गिता बाळासो गायकवाड, उपसरपंच श्री सुभाष तम्मा वर्डर, खटाव चे सरपंच श्री ओंकार गणपती पाटील, उपसरपंच श्री. श्रीकृष्ण शिवलींग पाटील, मुखवाडीचे सरपंच श्री वाळासो भगवान यादव, पंचायत समिती सदस्य प्रल्हाद गडदे हे प्रमुख उपस्थित होते. त्यांचा संचालको च्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्यविजय बँकेचे चेअरमन श्री प्रकाश बापू पयार यांनी मनोगत व्यक्त करुन संस्थेला शुभेच्छा दिल्या व संस्थेचे कार्य अतिशय उत्तम असून त्यांच्याकडून शिकण्यासाठी आम्ही संस्थेला भेट देवून माहिती घेवू अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमास वसगडे, नांद्रे, ब्रम्हनाळ, खटाव, सुखवाडी येथील ग्रामस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमास संस्थेचे संचालक अॅड एस. पी. मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ए. के. चौगुले (नाना) श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस. वी. पाटील (मोटके) संचालिका भारती आप्पासाहेब चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासो भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सभासद सेवक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी मानले. सुत्रसंचलन श्री. संजय सासणे यांनी केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.