Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत एकाचा निर्घ्रुण खून; अल्पवयीन मुलासह दोघे ताब्यात

सांगलीत एकाचा निर्घ्रुण खून; अल्पवयीन मुलासह दोघे ताब्यात


सांगली :  शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी येथे एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एका रेकॉर्डवरील गुन्हेगारासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
 
रवि रोहिदास काळे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित सकट याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. रवि काळे आणि संशयित राहुल सकट यांच्या पूर्वीचा वाद होता. सोमवारी रात्री इंदिरानगर येथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर रोहित सकट याने धारदार शस्त्राने काळे याच्यावर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर जखमी रविला तातडीने सांगलीच्या सिव्हील हॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  

सिव्हीलमध्ये जखमी रवीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. काळे याच्यावर हल्ला झाल्यानंतर विश्रामबाग पोलिस आणि एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरा एलसीबीच्या पथकाने संशयित रोहित सकट याला ताब्यात घेतले. दरम्यान मृत रवि काळे आणि रोहित सकट यांच्यात पूर्वीचा वाद होता. त्यातूनच हा खून झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.