Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या शाही विवाहात राष्ट्रवादीची चर्चा, अजितदादा अन् जयंत पाटील यांच्यात.

शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या शाही विवाहात राष्ट्रवादीची चर्चा, अजितदादा अन् जयंत पाटील यांच्यात.


शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या शाही विवाहात राष्ट्रवादीची चर्चा, अजितदादा अन् जयंत पाटील यांच्यात. लग्न रविवारी झाले. या शाही लग्नात राज्यातील आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आले. साताऱ्यामधील पाटणच्या दौलतनगर येथील कसबे मरळी येथे 50 ते 55 एकरांत गोरज मुहूर्तावर विवाह लागला.

या शाही लग्नाची सर्वत्र चर्चा झाली. परंतु या लग्नातील राजकीय नाट्याची चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाची किनार लग्नात दिसून आली. शाही लग्नाची चर्चा होत असताना राजकीय नाट्य दिसून आले.

राजकीय भेटीगाठी पण या भेटी नाहीच

शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नात राजकीय भेटीगाठी झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या जवळ जात विचारपूस केली. लग्नात राष्ट्रवादीमध्ये कधीकाळी सोबत काम करणारे नेते जयंत पाटील आणि अजित पवार सामोरासमोर आले. मात्र त्यांनी एकमेकांशी बोलणे टाळले. अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यामधील अबोला लग्न समारंभात दिसून आला. त्याची चर्चा लग्नानंतर होत राहिली. लग्नात संभाजी राजे छत्रपती यांना देखील एकनाथ शिंदे आणि आग्रहाने जवळ बसवून घेतले होते.

70 हजार लोकांच्या जेवणाची सोय

आमदार शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज यांचा विवाह धाराशिव जिल्ह्यातील राजे-निंबाळकर घराण्यातील डॉक्टर वैष्णवीराजे हिच्याशी झाला. वैष्णवी निंबाळकर यांनी एमबीबीएस केलंय. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची जबाबदारी यशराज यांच्यावर आहे.

या लग्नात अनेक मोठे नेते आले होते. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आले. तसेच देसाई यांचे मंत्रीमंडळातील अनेक सहकारी होते. लग्नसोहळ्यासाठी परिसरातील अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे 70 हजार लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. 65 बसेसमधून लग्नासाठी वऱ्हाड आणण्याची सोय करण्यात आली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.