Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजकीय निवृत्‍तीबाबत जीआर काढावा; शरद पवार गटाकडून अजित पवारांना आवाहन

राजकीय निवृत्‍तीबाबत जीआर काढावा; शरद पवार गटाकडून अजित पवारांना आवाहन


मुंबई:  शरद पवार ही व्यक्ती नसून एक विचार आहे. त्यांचे विचार कसे निवृत्त करणार आहात? शिव-शाहू-फुले-आंबेडकर असो की महात्मा गांधी-नेहरू असोत, त्यांचे विचार मारता येत नाहीत. अजित पवार यांना शरद पवार कळलेच नाहीत. त्यांचा वैचारिक गोंधळ झाला आहे? त्यांनी आपले राजकीय वैचारिक अंतिम ध्येय सांगायला हवे. तसेच अजित पवार यांनी सुद्धा राजकीय निवृत्तीबाबत जीआर काढावा, असे आवाहन शरद पवार गटाकडून करण्‍यात आहे आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला आहे. राज्य सरकारमध्ये निवृत्तीचे वय 58 असले तरी, काही लोक 80-84 वय झाले तरी थांबायला तयार नाही, अशी टिप्पणी अजित पवार यांनी शरद पवार यांचे थेट नाव न घेता केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड उत्तर देत राजकारणात नेमके वय किती पाहिजे तसा एक जीआर काढावा, असे आवाहन अजित पवार यांना केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे म्‍हणाले, अजितदादा मला कळत नाही राजकारणात अन् समाजकारणात वयाची भानगड काय आहे? वयापेक्षा आपली नीतिमत्ता, आपले आचार-विचार, आपले कर्तृत्व महत्त्वाचे नाही का? असा प्रश्न त्‍यांनी केला.

अजित पवार हे 37 वर्षीय युवा आमदार रोहित पवार यांना बच्चा म्हणतात आणि 84 वर्षीय लोकनेते शरद पवार यांच्या निवृत्तीचा आग्रह धरतात. मात्र दुसरीकडे 73 वर्षीय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी स्वतः ज्येष्ठ नागरिक (64 वर्षे) असल्याचे विसरून आग्रह करताना ते दिसत आहेत. दररोज भाजपची भाषा बोलू नका, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.