Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकार विषकन्येसारखे! नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

सरकार विषकन्येसारखे! नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

भंडारा : मी नेहमी गमतीने म्हणतो की, सरकार विषकन्येसारखे आहे. जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो. म्हणून मी कुठल्याही सरकारची मदत घेत नाही, सरकारी अधिकाऱ्यांकडे जात नाही. अधिकाऱ्यांना गळ घालता घालता डोक्यावरचे केस उडून जातात, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. 

भंडाऱ्यातील पवनी येथील ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने आनंद विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळेस त्यांनी वनाधिकाऱ्यांविषयी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली. गडकरी म्हणाले, भंडारा ते पवनी हा रस्ता निधी मंजूर झालेला असताना केवळ वन विभागाच्या जाचक अटींमुळे गेल्या १२ वर्षांपासून बंद पडला आहे. 

या कारणास्तव वनाधिकाऱ्यांसोबत अनेकदा मीटिंग घेतल्या, मात्र तरीही काम पूर्ण होत नाही. पुढे भंडारा ते पवनी या रस्त्याचे बांधकाम अनेक प्रयत्नांनंतरही थांबलेले असल्याने गडकरी यांनी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी आणि एसपींना भाषणादरम्यान विनंती करून आपण वैतागलो असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना उद्देशून 'या रस्त्यामध्ये आडकाठी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत टाका' असेही म्हटले.

समाजात कोणता धर्म नाही आणि जाती नाही. गरिबाला जात, पंथ, धर्म, जाती नसते, त्यामुळे मानवतेच्या आधारावर विचार केला पाहिजे. महिला, पुरुष, कामगार आणि शेतकरी अशा चारच जाती आहेत. माणूस हा जातीने नाही तर गुणाने मोठा आहे. या समाजातील अस्पृश्यता, जातीयता नष्ट झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.