Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संगीत क्षेत्रावर शोककळा, ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचं निधन

संगीत क्षेत्रावर शोककळा, ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन झालं. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मनित करण्यात आलं होतं. भारतीय संगीत क्षेत्रात प्रभा अत्रे यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. काही दिवसांआधी पुण्यात झालेल्या सवाई गंधर्व कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. शनिवार पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचा मृत्यू झाला होता. प्रभा अत्रे यांच्या निधनानं संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

काही दिवसांआधीच गायक राशीद खान यांचं निधन झालं होतं. राशीद खान यांच्या निधनानंतर संगीतसृष्टी बाहेर येत नाही तोच आज प्रभा अत्रे यांचंही निधन झालं. प्रभा अत्रे यांचा आज मुंबईत कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी त्या मुंबईत येणार होत्या. पण त्याआधीच त्याचं निधन झालं. 70 वर्ष त्या संगीत क्षेत्रात गात होत्या. त्यांचे नातेवाईक अमेरिकेत आहेत. ते भारतात आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यासाठी 1-2 दिवस लागू शकतात अशी माहिती समोर येत आहे.

स्वरांगिणी आणि स्वरांजीनी अशी दोन पुस्तकं त्यांनी लिहिली होती. त्याचप्रमाणे काही रागांचा त्यांनी नव्यानं आविष्कार देखील केला होता. भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. विदेशातील अनेक विद्यापिठात त्यांनी भारतीय शास्त्रीय संगिताचे शिक्षण दिले होते.


प्रभा अत्रे यांनी विज्ञान विषायतून पदवी संपादन केली. मात्र त्यांनी संगीत शिकण्याचा निर्णय घेतला. वडील शिक्षक असल्याने प्रभा अत्रे यांच्या निर्णयाला घरातून विरोध झाला नाही. त्या सुरेशबाबू माने यांच्याकडे गाणे शिकण्यासाठी गेल्या किराणा घराण्याचे संस्थापक खाँसाहेब अब्दुल करिमखाँ यांचे चिरंजीव असलेल्या सुरेशबाबू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभा अत्रे यांनी संगीताचे धडे गिरवले.

प्रभा अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 साली पुण्यात झाला. प्रभा अत्रे यांनी संगीतात खयाल, ठुमरी, दादरा, गजल आणि गीत यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. जागतिक पातळीवर भारतीय संगीताला वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. प्रभा अत्रे यांनी वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांनी स्वरामयी हे पहिलं पुस्तक लिहिलं होतं. संगीत विषयात त्यांनी पीएचडी मिळवली होती. लंडनच्या ट्रिनीटी कॉलेजमधून वेस्टर्न म्यूजिकचं शिक्षणही त्यांनी घेतलं होतं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.