Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दोषी ठरवल्याने आरोपीचा न्यायाधीशांवरच हल्ला, टेबलवरून उडी मारत केली बेदम मारहाण

दोषी ठरवल्याने आरोपीचा न्यायाधीशांवरच हल्ला, टेबलवरून उडी मारत केली बेदम मारहाण


अमेरिकेतील लास वेगास येथे न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका आरोपीने महिला न्यायाधीशावर हल्ला केला.


आरोपीने अचानक टेबलवरून उडी मारून महिला न्यायाधीशांवर हल्ला केला आणि तिला बेदम मारहाण केली. हे सर्व काही इतक्या वेगाने घडले की, न्यायालयात उपस्थित असलेले सुरक्षा कर्मचारी आणि इतर लोक महिला न्यायाधीशांना वाचवू शकले नाहीत. कसे तरी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरोपीवर नियंत्रण मिळवले आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना न्यायालयात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


काय आहे प्रकरण?

ही घटना लास वेगास येथील प्रादेशिक न्यायालयात घडली. आरोपी डिओब्रा डेलॉन रेडन (30) लास वेगासचा रहिवासी आहे. त्याला बुधवारी एका प्रकरणात सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. क्लार्क काउंटी जिल्हा न्यायाधीश मेरी या खटल्याची सुनावणी करत होत्या. न्यायाधीशांनी आरोपी डिओब्राला दोषी ठरवून तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. यामुळे आरोपी डिओब्रा इतका संतप्त झाला की त्याने अचानक टेबलवरून उडी मारून महिला न्यायाधीशांवर हल्ला केला.

घटनेच्या वेळी आरोपी पोलिसांच्या कोठडीत नव्हता. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरोपीने महिला न्यायाधीशांच्या खुर्चीवर उडी मारली, तिला जमिनीवर ढकलले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

तात्काळ प्रतिसाद देत कोर्ट मार्शल आणि इतर पोलिसांनी महिला न्यायाधीशांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी इतका संतापला की, त्याने महिला न्यायाधीशांना मारहाण सुरूच ठेवली. काही वेळानंतर आरोपींवर नियंत्रण मिळवण्यात आले. या हल्ल्यात महिला न्यायाधीश गंभीर जखमी झाल्या आहेत. न्यायाधीशांना वाचवणाऱ्या मार्शलच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याचा खांदाही मोडला आहे. महिला न्यायाधीशाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.