Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रामभक्ताने साकारली २० फुटांची पणती

रामभक्ताने साकारली २० फुटांची पणती

मिरज: श्रीराम मंदिर लोकार्पण आणि रामलल्लांचे आगमन याचे औचित्य साधून शहरातील ब्राम्हणपुरी येथील रामभक्त देसाई कुटुंबियांनी आपल्या घरासमोर २० फुट बाय साडेसात फुटांची भव्य पणती साकारली आहे. अयोध्येत रामलल्ला विराजमान होताच सकाळी ही पणती प्रज्वलित केली जाणार आहे. सलग दोन दिवस ती प्रज्वलितच राहणार असून, यासाठी ६० किलो तेल आणि ५ किलो कापसाचा वापर होणार आहे. रामभक्ताने हा आगळावेगळा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

आदित्य देसाई, मनोज देसाई आणि गिरीष देसाई यांनी सर्वात मोठ्या पणतीची ही संकल्पना राबवली आहे. दोन दिवसांपासून या पणतीचे दगड, विटा, माती आणि सिमेंट-वाळूच्या माध्यमातून बांधकाम करण्यात आले. आता त्यावर चारीबाजूने शंभर लहान पणत्या, पाठीमागे श्रीराम मंदिराचे पोस्टर आणि विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट केली जाणार आहे. यासाठी सुमारे ३० हजार रुपये इतका खर्च आला आहे. 


२० फुट लांब आणि साडेसात फुट रुंद असलेल्या या पणतीत दिवसभरात १५ किलोचे ४ तेलाचे डबे ओतले जाणार आदित्य आहेत. सदर पणती सिमेंट वाळूपासून बनविली असल्याने तेल पाझरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक तीन तासानंतर एक डबा ओतला जाणार आहे. तसेच पाच किलो कापसापासून पणतीची वात तयार करण्यात आली आहे. पालकमंत्री सुरेश खाडे आणि भाजपाचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांच्या हस्ते पणती प्रज्वलित केली जाणार आहे. राम मंदिर लोकापर्णानंतरही पुढील दोन दिवस ती प्रज्वलित ठेवली जाणार आहे. राम मंदिर लोकापर्णानिमित निस्सीम रामभक्त कुटुंबियांनी या भव्य पणतीची संकल्पना राबवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. रामंदिर लोकार्पण सोहळ्याचे ही पणती आकर्षण आहे. पणती पाहण्यासाठी गर्दी होत आहे.(आकाश देसाई, अनुज देसाई, आर्यन देसाई, प्रेम देसाई.)


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.