Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

समाज उत्थानाबरोबरच सशक्त राष्ट्रबांधणी करिता बीजेएस कटीबद्ध : केतनभाई शहा

समाज उत्थानाबरोबरच सशक्त राष्ट्रबांधणी करिता बीजेएस कटीबद्ध : केतनभाई शहा

सांगली : संपूर्ण भारतात सर्वोत्कृष्ट NGO म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या व गेली ३८ वर्षे संपूर्ण भारतात, समाजातील सर्वच घटकांसाठी, विविध रचनात्मक, विधायक कार्य करणाऱ्या पुणे मुख्य कार्यालय असलेल्या भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कोअर कमिटी सदस्य मा. केतनभाई शहा (सोलापूर) सांगली जिल्हा संपर्क दौरा केला.  यावेळी दि. सांगली ट्रेडर्स को- ऑप. क्रेडीट सोसायटी सांगलीच्या सभागृहामध्ये भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक आणि जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी महाराष्ट्र राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य केतनभाई शहा (सोलापूर) म्हणाले, बीजेएस ही गेली ३८ वर्षे सामाजिक कार्यामध्ये अविरत कार्य करीत असून सकल जैन समाजाच्या सर्वागीण विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. विविध सामाजिक, कौटुंबिक प्रश्नावर सखोल अभ्यास करून समस्या निवारण्याकरता विविध विज्ञाननिष्ट कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. युवती सक्षमीकरण, मूल्यवर्धन, वधू-वर परिचय संमेलन, व्यवसाय विकास मार्गदर्शन, अल्पसंख्यांक योजनांचा लाभ अशा विविध कार्यशाळा द्वारे समाज उत्थानाबरोबरच सशक्त राष्ट्रबांधणी करिता बीजेएस कटिबद्ध आहे. 

त्यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील सांगली शहर, आष्टा व विटा या ठिकाणी संपर्क बैठका घेऊन बीजेएसच्या मूल्यवर्धन, युवती सक्षमीकरण, दुष्काळ मुक्तीसाठी जलक्रांती प्रकल्प, आत्महत्याग्रस्त शेतकरी, कोविडयस्त व भूकंपग्रस्त पालकांच्या पाल्यांचे शैक्षणिक पुनर्वसन इत्यादी महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करून रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.


 

यावेळी बीजेएसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, भारतीय जैन संघटना संपूर्ण देशांमध्ये सर्व राज्यांमध्ये पोहचली आहे. करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रात सांगलीमध्ये बीजेएस व भगवान महावीर कोविड हॉस्पिटल यांच्या माध्यमातून ५०० हून अधिक करोना रुग्णांना जीवदान मिळाले. देशातील विविध भागातील दुष्काळ दूर करण्यासाठी अतिमागास जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा निर्माण होण्यासाठी केंद्र सरकार व नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली बीजेएस १०० जिल्ह्यातून १०० तलावामध्ये पाणीसाठा साठवण क्षमता वाढवणेचे कार्य येत्या ३ वर्षांमध्ये 'अमृतसरोवर योजनेअंतर्गत' करणार असून त्याद्वारे एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्था सुजलाम सुफलाम करणे असा अभिनव व बहुउपयोगी कार्यक्रम हाती घेतला आहे. जोश आणि होशच्या बळावर बीजेएस संघटना पुढे घेऊन जाणार आहोत.

यावेळी सांगली आष्टा व विटा सर्व ठिकाणी सांगली जिल्हा BIS जिल्हाध्यक्ष श्री. धन्यकुमार शेट्टी, सचिव वसंत पाटील, जिल्हा समन्वयक विकास शेळके (पलूस), BJS चे पश्चिम महाराष्ट्र सचिव वृषभ छाजेड (इचलकरंजी), इचलकरंजी शहर अध्यक्ष गौतम मुथा, राज्य कार्यकारणी सदस्य अभिनंदन खोत (कोल्हापूर) व राजगोंडा पाटील (सांगली), कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अशोक कुडचे, पश्चिम महाराष्ट्र सहसचिव बाहुबली पाटील, पश्चिम महाराष्ट्र कार्यालय समन्वयक राजाभाई शहा, सांगली जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, सदस्य धनंजय आरवाडे, सचिन रुईकर, अनिल चौगुले, दादासाहेब पाटील, मोहन चौगुले, रमेश पाटील (जयसिंगपूर) अभिजीत नाडगे, तसेच प्रसिद्ध उद्योजक बी. आर. पाटील (पलूस), महावीर पाटील (जैन मार्बल्स सांगली) तसेच सपना लड्डा, ज्योती पाटील, श्वेता कदम, सारिका धामणीकर, डॉ. दिलीप शिंदे  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.