Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षकानं आपल्याच विद्यार्थिनीशी केलं लग्न? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

शिक्षकानं आपल्याच विद्यार्थिनीशी केलं लग्न? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल


सध्या सोशल मीडियाच्या जगात दररोज विविध बातम्या समोर येत असतात. त्यातच आता आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामद्ये एका शिक्षक आणि विद्यार्थिनीने लग्न केल्याचे सांगितले जात आहे. जयप्रकाश याने सांगितले की, मी आणि जीनल एकमेकांवर मागील 5 वर्षांपासून प्रेम करतो आणि आधी आम्ही कोर्ट मॅरेज केले. कोर्टाच्या आदेशानंतर आम्ही मंदिरात जाऊ लग्न केले. लग्नानंतर मुलगी सुरतला चालली गेली. त्याठिकाणी ती नोकरी करते. तर दुसरीकडे जयप्रकाशही आता चकाईमध्ये आपली कोचिंग संस्था चालवत आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, जीनल माझी विद्यार्थिनी आहे. मात्र, असे काहीही नाही. ही माहिती खोटी आहे, असे जयप्रकाश याने सांगितले.

मी फक्त बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच शिकवतो आणि ती सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे. दोघांमध्ये मागील 5 वर्षांपासून प्रेम होते. जीनल ही झारखंड येथील रहिवासी आहे. तसेच ती चकाई आली होती. यानंतर दोघांची भेट झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर आता दोघांनी लग्न केले. दरम्यान, या लग्नाची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.