Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे अनावरण

कर्मवीर पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे अनावरण


सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली च्यावतीने सन २०२४ सालचे वार्षिक दिनदर्शिकेचे अनावरण संस्थेच्या संचालक मंडळ सभेत नुकतेच संपन्न झाले.

या दिनदर्शिकेमध्ये भारतीय सण परंपरा यांच्या माहिती सह विविध मुहुर्ताबाबत माहिती असून संस्थेच्या आर्थिक स्थितीसह विविध योजनांची माहिती या दिनदर्शिकेमध्ये दिली आहे. एक परिपुर्ण दिनदर्शिका या रुपाने सभासदांच्या माहिती साठी अनावरण करीत असल्याचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी यावेळी सांगितले.

या दिनदर्शिकेचे संस्थेच्या ६० शाखा असलेल्या गावामध्ये, तसेच सल्लागार सदस्य हितचिंतक, ठेवीदार, कर्जदार यांना वितरण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संस्थेचे संचालक अॅड. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ओ.के. चौगुले (नाना), श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस.बी. पाटील (मोटके). डॉ. चेतन पाटील, संचालिका श्रीमती भारती चोपडे, सौ. चंदन केटकाळे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे. श्री. लालासो भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.