Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा :-निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती

पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धुराळा :-निवडणुक आयोगाने दिली मोठी माहिती


मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. संपुर्ण देशभरात आगामी काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुकांचा गुलाल उधळणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणुक आयुक्तांनी मोठी माहिती दिली आहे.

सध्या मतदार किती ? 

यावर्षात किती मतदार वाढले.? तसेच यासंबंधी मोठी माहिती निवडणुक आयोगाने दिली आहे. मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदारसंख्येत एकूण ४.१२ लाख मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये महिला मतदारांची संख्या सर्वात जास्त ३.०८ लाखांनी वाढली आहे. तर महिलांचा १००० पुरूषांमागील ९२२ महिला असं प्रमाण झालं आहे. यामध्ये वयोगटाचं विचार केल्यास १८ ते १९ वयोगटातील ६.७० लाख मतदार असून ४.९२ लाख मतदार मृत झाले आहेत. तर डुप्लिकेट किंवा स्थलांतरीत मतदारांची संख्या ही ०.०५ लाखांवर गेली आहे. तर यामध्ये तृतीयपंथीयांची ५७२ संख्या आहे.

दरम्यान, राज्यात आगामी लोकसभा निवडणूक ही महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला अद्यापही ठरलेला नाही. परंतु जिंकेल त्याची जागा या नियमानुसार दोन्ही बाजूंनी जागा देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.