Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नागपूर शासकीय महाविद्यालयात रॅगिंग?

नागपूर शासकीय महाविद्यालयात रॅगिंग?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एमबीबीएसला असलेल्या विद्यार्थिनींच्या पालकांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे मुलींच्या वसतिगृहात रॅगिंग झाल्याची निनावी तक्रार केली. सोमवारी (ता. ८) रॅगिंग विरोधी समितीच्या बैठकीत मात्र वसतिगृहातील मुलींना विचारणा केली असता, सर्व मुलींनी रॅगिंग झालीच नाही, असे सांगत घुमजाव केले. 

अमृत महोत्सवानिमित्त मेडिकलमध्ये विविधरंगी कार्यक्रम सुरू होते. तर दुसरीकडे येथील विद्यार्थिनींची रॅगिंग झाल्याची निनावी तक्रार थेट महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पालकांनी केली. दरवर्षी एमबीबीएस, इंटर्नशिप किंवा एमडीच्या विद्यार्थ्यांकडून रॅगिगची एकतरी ऑनलाइन तक्रार मेडिकलमधून होते.

यावेळी मेडिकलमधील मुलींच्या वसतिगृह क्रमांक २ मधील मुलींच्या पालकांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे (नाशिक) १८ डिसेंबर २०२३ दरम्यान रॅगिंग झाल्याची निनावी तक्रार केली. १ जानेवारीला मेडिकल प्रशासनाकडे तक्रार वर्ग केली. त्यानुसार सोमवारी रॅगिंग विरोधी समितीची बैठक झाली. वसतिगृह क्रमांकामधील मुलींना या बैठकीत बोलावण्यात आले. मात्र सर्व मुलींनी रॅगिंग झालीच नाही, असे सांगितले. दरम्यान समितीकडून मुलींपुढे विविध पर्याय ठेवण्यात आले. संबंधितांवर कारवाईचे, नाव गुप्त ठेवण्याबाबतचे आश्वासन दिले. परंतु कुणीही पुढे आले नाही.

मागील वर्षी काय झाले?

मेडिकलमध्ये २०२२ मध्ये इंटर्नशिप करणाऱ्या सहा जणांना वसतिगृहातून बाहेर काढून त्यांची इंटर्नशिप रद्द केली होती. गतवर्षीचा इतिहास यापूर्वी मेडिकलच्या वसतिगृहात एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची निनावी तक्रार दिल्लीतील ॲन्टी रॅगिंग समितीच्या मदत क्रमांकावर करण्यात आली होती. तक्रार वर्ग होताच प्रशासनाकडून चौकशी केली. वसतिगृह क्रमांक ५ मध्ये एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मान खाली घालून उभे करणे, रात्री-बेरात्री मुलांना झोपेतून उठवून त्रास देण्यात येत असल्याचे नमूद होते.

२० सप्टेंबर २०२३ रोजी ॲन्टी रॅगिंग समितीची बैठकीत १०७ वरिष्ठ विद्यार्थी आणि ८२ एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची चौकशी केली गेली. चौकशीत विद्यार्थ्यांनी रॅगिंग झाली नसल्याचे लेखी दिले होते. मात्र पुढील काळात मानसिक दडपणाखाली असलेल्या एका मुलाने एमबीबीएस अभ्यासक्रमातील प्रवेश रद्द केला असल्याची जोरदार चर्चा होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.