Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेकिंग न्यूज ! मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस-पवार अयोध्येला जाणार नाहीत? नेमकं काय कारण

ब्रेकिंग न्यूज ! मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस-पवार अयोध्येला जाणार नाहीत? नेमकं काय कारण


जकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अयोध्येला जाणार नसल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील एकही मंत्री उपस्थित असणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूचक ट्विट करत माहिती दिली आहे.

मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे यांनी आजपासून मुंबईकडे येण्यासाठी सुरूवात केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण विषय आणि जरांगे पाटील मुंबईत येत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसं सूचक ट्विटही केलं आहे.

एकनाथ शिंदेंचं ट्विट-

अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासियांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे 26 जानेवारीला मुंबईमध्ये येणार आहेत. आज 20 जानेवारीला मुंबईकडे मराठा आंदोलक निघाले आहेत. मनोज जरांगे यांनी सर्व मराठा समाजाला आपल्यासोबत आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकांसह मुंबईत येणार असल्यानेच तर मुख्यमंत्र्यांनी अयोध्येतील जाणं रद्द केलं का? यावर आता एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.