Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनोज जरांगेंच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं, प्रकाश आंबेडकरांचा दावा

मनोज जरांगेंच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं, प्रकाश आंबेडकरांचा दावा

मराठा आरक्षणावर सरकारने प्रामाणिक राहिलं पाहिजे. एवढ्या लवकर तोडगा काढणं शक्य नाही. त्याला वेळ लागणार, डेटा गोळा करताना प्रचंड चुका आहेत. जरांगे पाटील यांनी लक्षात घेतलं पाहीजे की कितीही लोक घेऊन गेला तरी सत्तेतील लोकांना आरक्षण द्यायच नाही.

तसंच मनोज जरांगे पाटलांच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं. त्यामुळे त्यांनी पंगतीत जेवण करावं, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंना दिला आहे.

कायद्याच्या दृष्टीने जी शेवटची खिडकी आहे ती बंद करू नका. सरकारची मानसिकता नाही आरक्षण देण्याची. गेली अनेक आंदोलने निजामी मराठयांनी जिरवली आहेत. ओबीसींचे ताट वेगळे आणि गरीब मराठ्यांचे ताट वेगळे ठेवावे, मागणी करणारे अख्य जग मागू शकतात. दरम्यान त्यांनी आझाद मैदानावर मराठा समाजाचे आंदोलक बसले तरी काही बिघडणार नाही त्यामुळे पोलीस आणि मराठा आंदोलकांमधील संघर्ष टाळण्याचं आवाहन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात भित्रा माणूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात भित्रा माणूस आहे. मोदींनी आपण पंतप्रधान म्हणून नाही तर सामान्य माणूस म्हणू पूजा केल्याचं म्हटलं आहे. त्यांनी एक दिवसासाठी गुजरलीलाला नंदा शोधायला हवा होता. नात्र नायक सिनेमातील अनिल कपूर सारखी आपली अवस्था होते की काय अशी आपली अवस्था अशी भीती मोदींना होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.