Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार शहाजी पाटील पॅनेलचा धुव्वा, सूतगिरणी निवडणुकीत शेकापची बाजी

आमदार शहाजी पाटील पॅनेलचा धुव्वा, सूतगिरणी निवडणुकीत शेकापची बाजी


शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील  यांना महिला सूतगिरणीच्या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे. सूतगिरणीच्या सर्व 21 जागांवर शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख  यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. सांगोल्यात शेकाप आणि आमदार पाटील गट हे पारंपरिक विरोधक आहेत. विधानसभे पूर्वीच शेकाप कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील गटाला सूतगिरणीच्या निवडणुकीत व्हाइट वॉश दिला आहे. महिला सूतगिरणी निवडणुकीत शेकापच्या सर्व २१ जागांवर महिला उमेदवार विजयी झाले आहेत.

या निवडणूकीच्या निकाला नंतर शेकाप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत बाबासाहेब देशमुख यांची मिरवणूक काढली. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा करुन शेकाप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.