Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकारी अधिकारी शिव बालकृष्ण यांच्याकडून तब्बल १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त !

सरकारी अधिकारी शिव बालकृष्ण यांच्याकडून तब्बल १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त !


शिव बालकृष्ण यांच्या घरावरील धाडीत जप्त करण्यात आलेली मालमत्ता भाग्यनगर (तेलंगाणा) - तेलंगणामधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 'तेलंगाणा रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी' (तेलंगाणा भूमी खरेदी-विक्री नियामक प्राधिकरण) या सरकारी विभागाचे सचिव शिव बालकृष्ण यांच्या घरावर धाडी घातली.


या वेळी त्यांच्या घराच्या परिसरातून तब्बल १०० कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आली. शिव बालकृष्ण आणि त्यांच्या नातेवाइक यांची घरे अन् कार्यालये यांसह २० ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. या वेळी बालकृष्ण यांना अटक करण्यात आली.

१. या वेळी ४० लाख रुपये रोख, २ किलो सोने, ६० महागडी घड्याळे, १४ स्मार्टफोन, १० लॅपटॉप आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली.

२. या सर्वांची किंमत १०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

३. बालकृष्ण यांच्या घरातून नोटा मोजण्याचे यंत्रही जप्त करण्यात आले आहे.

४. बालकृष्ण हे 'हैदराबाद महानगर विकास प्राधिकरणा'चे संचालकही राहिले आहेत.

५. भूमीच्या खरेदी-विक्रीशी संबंधित व्यवसाय करणार्‍या अनेक आस्थापनांना 'परमिट सुविधा' देऊन त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

'तेलंगाणा रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी'चे सचिव आहेत बालकृष्ण

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडी घातल्यानंतर अटक

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.