सिलेंडरवर ठेवा फक्त एक वाटी; परिणाम पाहून विश्वास बसणार नाही
आजकाल कोणाच्या घरात गॅस सिलेंडर नाही, असे नाही. पूर्वीच्या काळी लोक स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर करत होते. पण, आजकाल प्रत्येकाच्या घरात गॅस सिलेंडर हा असतोच. असे पाहिला गेले तर सध्याच्या काळात खेड्यापाड्यात देखील गॅस सिलेंडरचा सर्रास वापर केला जातो. कारण गॅस सिलेंडर असेल तर काम पटकन होतात. त्यामुळे अनेक महिलांना कल हा गॅस सिलेंडरवर स्वयंपाक करण्याचा असतो.
पूर्वीच्या काळी महिला या चुलीवर स्वयंपाक करत होत्या. लाकड आणण्यापासून ती चूल पेटवण्यापर्यंत अनेक कामे महिलांना करावी लागत होती. मात्र, आता गॅस सिलेंडर घराघरात आल्यामुळे महिलांचा वेळ वाचला आहे. तसेच गॅस सिलेंडर वापरणे खूपच सोईस्कर झाले आहे. पण, जितके गॅस सिलेंडर वापरणे सोपे आहे तितकाच तो काळजीपूर्वक हाताळणे देखील महत्त्वाचे आहे.
कारण एखादा गॅस लिकेज असेल तर गॅस गळती होण्याची शक्यता असते. यामुळे स्फोट देखील होऊ शकतो. त्यामुळे गॅस हाताळण्यापूर्वी खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे. जेणेकरुन कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. यावरुन तुम्ही अगदी सहजरित्या गॅस सिलेंडरमधून गळती होत आहे की नाही हे तपासू शकता.सिलेंडरवर ठेवा फक्त एक वाटी
या गृहीणीनं सांगितल्या प्रमाणे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही लिकेज गॅस ओळखू शकता, तुम्हाला काय करायचंय तर… सिलेंडरमध्ये रेग्युलेटर असलेल्या ठिकाणी थोडे पाणी टाकावे. सिलेंडरवर जे पांढऱ्या रंगाचं झाकणं (रेग्युलेटर)असतं ते काढा. त्यात तुम्हाला एक होल दिसेल त्यात एक चमचा पाणी टाका आणि त्यावर वाटी ठेवा. वाटीनं ते झाकल्यानंतर २, ते ३ मिनिटांनी ती वाटी काढा आणि जर बुडबुडे येत असतील तर समजा तुमचा सिलेंडर लिकेज आहे.
तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील सिलेंडर गळत आहे की नाही ते वास घेऊन तपासू शकता. जर तुम्हाला थोडेसेही असे वाटत असेल तर गॅस रेग्युलेटरजवळ आणि पाईप जॉइंटच्या ठिकाणी वास घ्यावा लागेल. असे केल्याने तुम्ही गॅस गळती झाली आहे का हे पाहू शकाल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.