Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोलापुरात बापाने केली मुलाची हत्या; कोल्ड ड्रिंकमध्ये विष घालून पाजले

सोलापुरात बापाने केली मुलाची हत्या; कोल्ड ड्रिंकमध्ये विष घालून पाजले


शाळेत खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापानेच स्वतः च्याच मुलांना कोल्ड ड्रिंकमध्ये विष घालून जीवे मारल्याचे दुर्दैवी घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर शहर हे सोमवारच्या दिवशी अतिशय दुर्दैवी घटनानी हादरून गेले आहे.

सकाळ सकाळी तीन जिवलग मित्र दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये मरण पावले. त्या घटनेने सोलापूर हळूहळून निघाले. याचं दुःख संपते ना लगेच एका बापाने स्वतःच्याच मुलाचा जीव घेतल्याची दुसरी दुर्दैवी घटना समोर आली.

दिनांक 13 जानेवारी रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास, सोलापूर-तुळजापूर हायवे रोडवरील सर्विस रोडलगत नाल्याजवळ एक लहान मुलाचा मृतदेह आढळला होता. संबंधित माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी तत्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं होतं. पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू (वय- 14 वर्षे, राहणार भवानी पेठ सोलापूर) अशी पटली.

आपल्या राहत्या घरातून तो सायंकाळी घराबाहेर पडला होता. पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि घरापासून ते घटनास्थळापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादीचे पती म्हणजेच मयत मुलाचे वडील यांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मयत मुलाच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीने दिलेली माहिती अशी की, मुलगा विशाल हा शाळेत व शेजारील लोकांच्या सतत खोड्या काढायचा. त्याच्या शाळेतील सततच्या तक्रारी, अभ्यास न करणे, घरात व शाळेत खोड्या काढणे, सतत मोबाईल पाहणे याचा राग मनात धरून त्यांनी त्याला थम्सअपमध्ये सोडीयम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून जिवे ठार मारल्याची कबुली बापाने दिली आहे. सदर गुन्ह्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भादवि 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यापुढील तपास पो.नि जगताप हे करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.