Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत भावी डॉक्टरवर अज्ञाताचा गोळीबार!

सांगलीत भावी डॉक्टरवर अज्ञाताचा गोळीबार!


सांगली :  शहरातील जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे फाटकाच्या परिसरात महाविद्यालयीन तरूणावर अज्ञाताने गोळीबार केला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. गोळीबार कोणी केला याबाबत कोणतीच माहिती रात्री उशीरापर्यत समजू शकली नाही. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात रात्रीपर्यत गुन्हा दाखल झाला नव्हता. शहरात काल एका शालेय मुलावर हल्ला झाला, त्यानंतर आता महाविद्यालयीन तरूणांवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. शहरात एकापाठोपाठ एक घटना घडत असल्याने घबराटीचे वातावरण आहे.


रत्नजीत विजय पाटील (वय २०, रा. होळीचा टेक, कवलापूर, ता. मिरज्) असे जखमीचे नाव आहे. या युवकाच्या दंडीत जखम होवून रक्त येत असल्याने तो तातडीने खासगी रुग्णालयात दाखल झाला. तोपर्यत त्याला गोळी घुसल्याची कोणतीही कल्पना नव्हती. एक्सरे काढल्यानंतर लहान आकाराची गावठी बंदुकीची गोळी दंडात घुसल्याचे निष्पन्न झाले. सध्या युवकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रत्नजीत पाटील हा मिरज वैद्यकीय महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे, तो दुचाकीवरुन जुना बुधगाव रस्ता मार्गे सांगलीकडे येत होता. रेल्वे फाटकाच्या पुढे आला असता त्याला दंडाला काहीतरी लागल्याचे जाणवलें. थोड्या अंतरावर त्याने दुचाकी थांबवून पाहिले असता दंडातून रक्त असल्याचे त्याला दिसले. त्यानै मित्राला दंडाला दगड लागला असल्याचे सांगून तातडीने घटनास्थळी येण्यास सांगितले. शहरातील एका खाजगी रुग्णालयात तो दाखल झाल्यावर् तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक्सरे काढल्यावर त्यामध्ये दंडात गावठी बंदुकीची लहान गोळी घुसल्याचे निष्पन्न झाले.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तसैच रुग्णालयात जावून जखमी युवकाची विचारपूस केली. युवकाने पोलिसांना, बंदुकीतून उडालेली गोळी मला लागल्याचे समजले नसल्याची माहिती स्थानिक गुन्हेचे पोलिस निरिक्षक सतीश शिंदे यांनी दिली. दरम्यान, युवकावर कोणी गोळीबार केला की परिस्रात असणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या हातातील बंदुकीतून चूकून गोळी सुटल्याने युवक जखमी झाला याबाबत युवकासह पोलिस देखील अनभिज्ञ आहेत. पोलिस तपासात औधक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.