Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठी माणूस उद्योगात आला पाहिजे.. उद्योग मेळावा आयोजनात सहाय्य करणार : रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन

मराठी माणूस उद्योगात आला पाहिजे.. उद्योग मेळावा आयोजनात सहाय्य करणार : रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन


सांगली दि.३१: मराठी माणूस उद्योग क्षेत्रात आला पाहिजे.. युवक - युवती व महिला यांच्या साठी शासनाच्या उद्योग व व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या अनेक सबसिडी योजना आहेत. त्याचा लाभ होण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे मेळावे भरविण्यात कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था व दक्षिण भारत जैन सभेचे सहकार्य करणार आहे असे प्रतिपादन कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील अण्णा यांनी केले. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पदी विद्या कुलकर्णी यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार करताना ते बोलत होते.

रावसाहेब पुढे म्हणाले, 'मराठी माणूस उद्योग क्षेत्रात येण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने त्यांना प्रोत्साहन व मदत करावे. त्यासाठी मेळावे आयोजित करावेत. तुंग गावात मेळावा आयोजित करु या. शासनाच्या योजनेचे लाभ उद्योजकांना करुन देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कसोशीने प्रयत्न करील. असे कुलकर्णी यांनी विनोद पाटोळे यांना सांगितले. पाटोळे यांनी जिल्हा उद्योग केंद्राचा तुंग येथे मेळावा आयोजित करण्यासाठी सहकार्य केले जाईल असे आश्वस्त केले. यावेळी रावसाहेब पाटील, विनोद पाटोळे,रमेश आरवाडे, जॉईंट सेक्रेटरी चेंबर ऑफ कॉमर्स व विपुल पाटील उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.