अभिनेत्रीवर बलात्कार; सोलापूरच्या विराज पाटील याच्यावर गुन्हा दाखल
पुणे : राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एका युवकाने अभिनेत्री तरुणीवर बलात्कार करुन तिच्या डोक्याला पिस्टल लावून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात विराज रविकांत पाटील (वय 35 रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) याच्यावर बलात्काराचा आणि आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित अभिनेत्री असलेल्या तरुणीने शक्रवारी फिर्याद दिली आहे.
याबाबत टिंगरेनगर परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. यावरुन विराज रविकांत पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 27 ऑगस्ट 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत विमाननगर व मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विराज पाटील याची राजकीय पार्श्वभूमी आहे. तर पीडित तरुणी अभिनेत्री आहे. आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख फेसबुकव्र झाली. आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने पीडित तरुणीला टाळू लागला. त्यामुळे फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली.घरच्यांना का भेटवत नाही अशी विचारणा केली असता विराज पाटील याने तिला शिवीगाळ केली. तसेच त्याच्याकडे असलेले पिस्टल तरुणीच्या डोक्याला लावून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तु जर पोलिसांकडे गेली तर तुला दाखवतो मी कोण आह ते, अशी धमकी देऊन धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.