Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू!

गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू!


पुणे :  शुक्रवारी भरदुपारी झालेल्या गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा मृत्यू झाला आहे. आज घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे शहराला हादरवून सोडले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोथरुड येथील सुतारदरा भागात आज दुपारी काही अज्ञात हल्लेखोरांनी येऊन शरद मोहोळ याच्यावर लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच शरद मोहोळचा मृत्यु झाला.

सध्या पोलीस या सर्व घटनेचा कसून तपास करीत आहेत. तसेच हल्लेखोर नेमके कोण होते त्यांनी शरद मोहोळ याला मारण्याचा डाव कसा आखला याचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे पुण्यात एकच उडाली आहे. तसेच पुणे शहरातील नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. अद्याप या हल्ल्याविषयी कोणतीही माहिती समोर आली नसली तरी गँगवॉर प्रकरणातून शरद मोहोळ यांची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.