Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

येणाऱ्या भविष्यकाळात वहिनी साहेबांना मोठे पद मिळणार ;राज्य प्रवक्ते संतोष पाटील

येणाऱ्या भविष्यकाळात वहिनी साहेबांना मोठे पद मिळणार ;राज्य प्रवक्ते संतोष पाटील


सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांची महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्सच्या महिला विभागातून बिनविरोध संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आज मराठा स्वराज्य संघ, स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठान व दरारा या सामाजिक संघटनेच्या वतीने आज विजय बंगल्यावर जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की 

येणाऱ्या भविष्यकाळामध्ये वहिनी साहेबांना मोठं पद मिळेल व त्याचा उपयोग सांगलीच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी व सांगलीतील जनतेच्या भलेसाठी त्याचा भरपूर उपयोग होईल अशी भावना व्यक्त केली तसेच महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्सच्या संचालिका पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आपल्या कामाची पोचपावती मिळाली. येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकी विषयी चर्चाही केली या वेळेला गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिकाचे जिल्हाध्यक्ष मा. रघुनाथ नार्वेकर, सागर साळुंखे, विजय पाटील, काशिनाथ आलदर, श्रीकांत कोळीगीरी, किशोर पकाली,श्रेयश लोहार, विनायक शिंदे, धनंजय खाडिलकर, रोहन नार्वेकर, संजय पाटील, हो इतर अनेक जण उपस्थित राहून सर्वांनी वहिनी साहेबांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.