राज्य उत्पादन शुल्कच्या ८३ निरीक्षकांच्या बदल्या कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील १४ जणांचा समावेश
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राज्य उत्पादन शुल्कच्या ८३ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील १४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्य शासनाचे उप सचिव रविंद्र औटे यांच्या सहीने सोमवारी बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत.
कोल्हापूरचे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक पंकज कुंभार यांची पंढरपूर येथे, कोल्हापूर भरारी पथकाचे पांडुरंग पाटील यांची ब्लेंडसर् प्रा. लि. पुणे येथे गडहिंग्लज कारखान्याकडील अविनाश घाटगे यांची टेंभूरणी येथे, कुंभी कासारी कारखान्याकडील मिलींद गरूड यांची कुडाळ येथे, शिरोळच्या दत्त कारखान्याकडील नितीन शिंदे यांची कणकवली येथे, कागल तपासणी नाका येथील राजेंद्र दिवसे यांची मुंबई एच विभाग येथे, इचलकरंजी येथे अशोक साळोखे यांची छत्रपती संभाजीनगर क विभाग येथे, गडहिंग्लज येथील सचिन भवड यांची माळशिरस येथे, शाहुवाडीचे नंदकुमार देवणे यांची बारामती येथील माळेगाव कारखाना येथे, हातकणंगले येथील संभाजी बरणे यांची सासवड येथे, कागल येथील जगन्नाथ पाटील यांची सोलापूर अ विभाग येथे, शिराळा येथील नाईक कारखान्याकडील श्रीकांत हुनुंगरे यांची कुडित्रे येथील कारखाना बदली करण्यात आली आहे. फलटण येथील महेश गायकवाड यांची हातकणंगले येथे बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली प्रकाश गौडा (सी विभाग मुंबई ते विभागीय भरारी पथक, नाशिक), विलास बामणे (डी विभाग मुंबई ते भरारी पथक १ नाशिक), जे. एम. खिलारे (एच विभाग मुंबई ते बी विभाग ठाणे), विनय शिर्के (एच विभाग मुंबई उपनगर ते डी विभाग मुंबई शहर), एस. व्ही. कांगणे (एच विभाग मुंबई उपनगर ते भरारी पथक बीड), संदीप मोरे (टी विभाग मुंबई उपनगर ते एफ विभाग, पुणे), आर. के. शिरसाठ (बी विभाग ठाणे ते एस विभाग मुंबई उपनगर), एन. एन. मोरे (भरारी पथक ठाणे ते टी विभाग मुंबई उपनगर), एम. पी. घनशेट्टी (डहाणू ते भरारी पथक ठाणे), डी. एम. बामणे (वसई ते तपासणी नाका सोलापूर), एस. एस. आंबेरकर (भरारी पथक पालघर ते कागल), अमित पाडळकर (कुडाळ ते भरारी पथक रत्नागिरी), प्रभात सावंत (कणकवली ते लांजा), विक्रमसिंह मोरे (लांजा ते बी विभाग नागपूर), संजय दळवी (भरारी पथक रत्नागिरी ते तपासणी नाका कागल), राजाराम शेवाळे (सी विभाग पुणे ते फलटण), अनिल पवार (डी विभाग पुणे ते एम विभाग मुंबई उपनगर).
दीपक सुपे (एफ विभाग पुणे ते मिरज), प्रवीण शेलार (सासवड पुणे ते वसई), समीर पाटील भरारी पथक क्र. १ पुणे ते दत्त कारखाना शिरोळ), राजेश भापकर (माळेगाव कारखाना बारामती ते नाईक कारखाना शिराळा), अनुपकुमार देशमाने (लोकरंजन ब्रेव्हरिज पुणे ते भरारी पथक २ अहमदनगर), जनार्दन होले (ब्लेंडसर् प्रा. लि. पुणे ते मुळा कारखाना नेवासा), आर. एम. बांगर (अ विभाग सोलापूर ते धाराशिव), किरण बिरादार (पंढरपूर ते शाहुवाडी), सदानंद मस्करे (ब विभाग सोलापूर ते भरारी पथक जळगाव), संदीप कदम (माळशिरस ते सी विभाग पुणे), गुलाब जाधव (सिद्धेश्वर कारखाना कुमठे सोलापूर ते भरारी पथक छत्रपती संभाजीनगर), एस. आर. कुसळे (खंडोबा डिस्टलरीज टेंभुरणी ते भरारी पथक १ अहमदनगर), नंदकुमार जाधव (विभागीय भरारी पथक पुणे ते बी विभाग सोलापूर), एस. वाय. श्रीवास्तव (संगमनेर ते डी विभाग पुणे), ए. बी. बनकर (भरारी पथक १ अहमदनगर ते तपासणी नाका करंजाळी नाशिक), जी. आर. चांदेकर (भरारी पथक २ अहमदनगर ते भरारी पथक २ सटाणा नाशिक), आर. डी. वाजे (मुळा कारखाना ते कोल्हापूर), डी. बी. लगड (अशोक कारखाना श्रीरामपूर ते युनायटेड ब्रेव्हरीज छत्रपती संभाजीनगर), सुनील देशमुख (ब विभाग नाशिक ते डहाणू), गंगाराम साबळे (क विभाग नाशिक ते वाळुंज), सुनिल सहस्त्रबुद्धे (कळवण ते संगमनेर), दशरथ जगताप (मालेगाव ते विभागीय भरारी पथक नांदेड), विठ्ठल चौरे (येवला ते भरारी पथक नंदूरबार), देवदत्त पोटे (भरारी पथक २ सटाणा ते भरारी पथक १ पुणे), किशोर गायकवाड (तपासणी नाका करंजाळी ते चाळीसगाव), डी. एस. चकोर (भरारी पथक नंदूरबार ते जळगाव शहर), चंद्रकांत पाटील (भरारी पथक जळगाव ते कळवण), लिलाधर पाटील (जळगाव ते मालेगाव), आर. जे. पाटील (चाळीसगाव ते ब विभाग नाशिक), अनिल पाटील (मधुकर कारखाना फैजपूर ते विभागीय भरारी पथक छत्रपती संभाजीनगर), अरूणकुमार चव्हाण (विभागीय भरारी पथक नाशिक ते भरारी पथक पालघर), शरद फटांगडे (युनायटेड ब्रेव्हरीज छत्रपती संभाजीनगर ते येवला), प्रकाश घायवट (चिकलठाणा ते येवला), नारायण डहाके (क विभाग छत्रपती संभाजीनगर ते किनवट), संजय जाधव (वाळूंज ते श्रीरामपूर), कारभारी रावते (वाळूंज ते श्रीरामपूर), अमजदखान पठाण (नांदेड ते भरारी पथक परभणी), एम. ए. शेख (किनवट ते वधार्), साहेबराव बोदमवाड (बिलोली ते पांढरकवडा), जावेद कुरेशी (गेवराई ते बिलोली), प्रवीण मोहतकर (क विभाग नागपूर ते गडचिरोली), जितेंद्र पाटील (क विभाग नागपूर ते एच विभाग पुणे), नरेंद्र थोरात (ड विभाग नागपूर ते विभागीय भरारी पथक पुणे), राजेंद्र बोलधने (तपासणी नाका रामटेक ते भरारी पथक वर्धा), मोहन पाटील (भरारी पथक वर्धा ते क विभाग नागपूर), रामसुभग शेंगर (विभागीय भरारी पथक नागपूर ते भरारी पथक यवतमाळ), डी. के. क्षीरसागर (अकोट ते विभागीय भरारी पथक नागपूर), जयेंद्र जठार (पांढरकवडा ते डी विभाग नागपूर), संतोष भटकर (भरारी पथक यवतमाळ ते अकोट), प्रमोद खरात (पुसद ते गडहिंग्लज).
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.