Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या बिल्डरला दणका

सांगलीच्या बिल्डरला दणका


सांगली:  फ्लॅटच्या करारापोटी दिलेले १९ लाख २५ हजार ६५० रुपये, त्यावर ९ टक्के व्याज व भरपाईसह रक्कम बिल्डरने ग्राहकाला ३० दिवसात परत करावेत असे आदेश सांगली येथील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. प्रदीप हैबती कदम ( रा. बांबवडे ता. पलूस) यांची नवोदय बिल्डर्स व डेव्हलपर्स नावाची फर्म आहेत. त्यांनी सह्याद्रीनगर, सांगली परिसरातील सि. स. नं. ६६४३ हा प्लॉट २०१२ मध्ये खरेदी केला व त्यावर विश्व प्राईड नावाचे अपार्टमेंट बांधण्याचे ठरविले. या अपार्टमेंटमधील १०४८ चौ. फुटाचा फ्लॅट घेण्याबाबतचा करार मिरज येथील संगीता सुरेश कुंभार यांनी २६ एप्रिल २०१३ रोजी या बिल्डरशी केला.

करारानुसार त्या फ्लॅटची किंमत २५ लाख रुपये ठरली व १८ महिन्यांमध्ये त्या फ्लॅटचा ताबा देण्याचा दोघांमध्ये करार झाला. त्यानंतर वेळोवेळी कुंभार यांनी या बिल्डरला १९ लाख २५ हजार ६५० रुपये दिले. दरम्यानच्या काळात ६ डिसेंबर २०१९ रोजी संगीता कुंभार यांचे निधन झाले.

त्यानंतर त्यांच्या वारसदारांनी बिल्डरकडे फ्लॅट किंवा दिलेली रक्कम परत करण्याची मागणी केली. बिल्डरने वेगवेगळे कारणे सांगून टाळाटाळ केली म्हणून कुंभार यांच्या वारसदारांनी सांगली येथील ग्राहक न्यायालयामध्ये बिल्डर विरुद्ध तक्रार दिली. बिल्डरने ग्राहकाला सदोष सेवा दिल्याचे न्यायालयात शाबित झाले.
    
बिल्डर यांनी घेतलेली रक्कम, त्यावर ९ टक्के व्याज, मानसिक त्रासापोटी एक लाख रुपये व अर्जाचा खर्च म्हणून २५ हजार रुपये ३० दिवसात संगीता कुंभार यांच्या वारसदारांना देण्याचे आदेश प्रमोद गोकुळ गिरी गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील अश्फाक नायकवडी व श्रीमती निलांबरी देशमुख यांच्या पीठाने दिले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.