Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावधान, किडनीमध्ये समस्या असेल तर शरीर देते असे संकेत, करू नका दुर्लक्ष

सावधान, किडनीमध्ये समस्या असेल तर शरीर देते असे संकेत, करू नका दुर्लक्ष


किडनी हा शरीरातील सर्वात महत्वाचा भाग असून किडनी प्रामुख्याने युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्ताला फिल्टर करण्यासाठी मदत महत्त्वाची भूमिका बजावत असते.
हे सर्व विषारी पदार्थ आपल्या मूत्राशयात जातात आणि लघवी करत असताना ते बाहेर पडतात. अनेकजण किडनीच्या समस्येने हैराण आहेत. किडनीमध्ये समस्या असेल तर शरीर वेळीच संकेत देते.

श्वास घेण्यास त्रास

तुम्हाला वारंवार श्वास घेण्यास त्रास होत असल्यास याकडे लक्ष देऊ नका. हे किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत रेथ्रोपोएटिन नावाच्या संप्रेरकाच्या निर्मितीवर परिणाम होतो, हा हार्मोन  तयार होते.

झोपेचा अभाव

किडनीच्या कार्यामध्ये अडथळे आली तर झोपेवर परिणाम होतो, त्यामुळे निद्रानाशाची समस्या निर्माण होते. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

खाज सुटणे

जेव्हा किडनीच्या समस्येमुळे विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नसल्याने घाण रक्तात जमा होऊ लागते. त्यामुळे त्वचेवर खाज येते.

लघवीच्या रंगात होतो बदल

किडनी खराब होते तेव्हा जास्त प्रथिने बाहेर पडू लागतात. त्यामुळे लघवीचा रंग पिवळा किंवा तपकिरी होतो, अनेक वेळा लघवीतून फेस आणि रक्तही येऊ लागते.

चेहरा आणि पाय सुजतो

ज्यावेळी मूत्रपिंड आपल्या शरीरातून सोडियम काढू शकत नाही, त्यावेळी ते शरीरात जमा होऊ लागते. असे झाले तर पाय आणि चेहऱ्याला सूज येऊ लागते.

स्नायू पेटके

मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे पाय आणि स्नायूंमध्ये पेटके येतात. सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम किंवा इतर इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळीत असंतुलन आहे.

वाढलेला थकवा

किडनीच्या फिल्टरिंग प्रक्रियेत अडथळे आले तर शरीरातील विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. त्यामुळे अशक्तपणा दिसू लागतो आणि थकवाही जाणवू लागतो.

श्वास घेण्यास त्रास

झोपेचा अभाव

खाज सुटणे

लघवीच्या रंगात होतो बदल

चेहरा आणि पाय सुजतो

स्नायू पेटके

वाढलेला थकवा

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.