Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एसटी चालक-वाहकांची आता ओळख पटणार गणवेशासह नावाची पाटी व बॅच बिल्ला लावणे बंधनकारक : शर्मिंला पोळ


एसटी चालक-वाहकांची आता ओळख पटणार गणवेशासह नावाची पाटी व बॅच बिल्ला लावणे बंधनकारक : शर्मिंला पोळ  

सातारा :  महाराष्ट्रांच्या परिवहन खात्यामध्ये चालक-वाहक विना वर्दीं परिधान करुन कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे प्रवासादरम्यान झालेल्या  त्यांच्याविषयी गैरवर्तन किंवा काही अडीअडचणी तक्रारी करण्याकरिता प्रवाशांना एसटी महामंडळाकडे पोहोचता येत नाही. याच अनुषंगाने आता चालक-वाहकांचे दैनंदिन कर्तव्य सुरु होण्यापूर्वी याबाबतची खातरमजा त्या त्या आगारांचे वाहतूक नियंत्रक वाहतूक पर्यवेक्षकांची जबाबदारी असणार आहे. त्या बाबतच्या सूचना संबंधित सर्व विभागीय नियंत्रक आगार व्यवस्थापक यांना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी ३१ जानेवारीपूर्वीं करण्याचेही महामंडळाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे, अशी माहिती शर्मिष्ठा पोळ यांनी दिली.

एसटी महामंडळ नियमानुसार सर्व चालक-वाहक यांनी आपल्या कर्तव्यावर असताना त्यांना दिलेल्या गणवेशासह त्यावर नावाची पाटी व बॅच बिल्ला लावणे आता बंधनकारक असणार आहे. काही वेळा एसटीच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना चालक वाहक यांच्या वर्तनाविषयी वाईट अनुभव येत असतात. त्यांच्याबाबत एसटी महामंडळास काही सूचना, तक्रारी द्यायची असेल तर संबंधित चालक-वाहक यांच्या नावाची बॅच बिल्लाची माहिती होत नाही. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या तक्रारी सूचना एसटी महामंडळापर्यंत पोचविण्यास मोठा कालावधी लागतो. 

याच अनुषंगाने एसटी महामंडळाने विचार करुन आता जे चालक-वाहक कर्तव्यावर असतील ते त्यांना दिलेल्या खाकी गणवेशातसह नावाच्या पाटी व बॅच बिल्ला यासह असतील असा आदेश एसटी महामंडळाकडून नुकताच जाहीर करण्यात आला आहे. याबाबत ३१ जानेवारीची अंतिम मुदत सर्व आगार व्यवस्थापकांना घेण्यात आली आहे. 

कर्तव्यावरील एसटी चालक वाहकाने त्यांच्याच गणवेशात नावाची पाटी व बॅच बिल्ला लावणे महामंडळाच्या आदेशानुसार बंधनकारक आहे. अनेकदा चालक-वाहक गणवेश परिधान न करता कर्तव्य बजावत असतात असे चित्र देखील तपासणी अधिकाऱ्यांना नेहमीच दिसून येते. त्यामुळे प्रवाशांना ते कोण आहेत. त्याची ओळख पटत नाही त्याचाच विचार करुन आता गणवेशासह संबंधित माहिती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांनी त्याचे पालन न केल्यास संबंधित चालक वाहकांसह त्या आगाराचे आगार व्यवस्थापक व वाहतूक पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.