Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नारायण राणेंसह मोदी सरकारमधील नऊ मंत्री होणार 'रिटायर्ड;' पुन्हा संसदेत की घरचा रस्ता...

नारायण राणेंसह मोदी सरकारमधील नऊ मंत्री होणार 'रिटायर्ड;' पुन्हा संसदेत की घरचा रस्ता...


नारायण राणे महाराष्ट्रातील भाजपचे महत्त्वाचे नेते असून त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खाते आहे. भाजप त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवू शकते. मनसुख मांडवीया कोरोनाकाळात आरोग्यमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी मिळाली. गुजरातमधून लोकसभा निवडणुकीत उतरू शकतात.

धर्मेंद्र प्रधान भाजपचे महत्त्वाचे नेते असून सध्या ते शिक्षण व कौशल्य विकासमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता. अश्विनी वैष्णव रेल्वे व माहिती तंत्रज्ञान या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी. वंदे भारतसह विविध नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका.

भूपेंद्र यादव भूपेंद्र यादव हे पर्यावरण, वन व वातावरणीय बदल खात्याचे मंत्री आहेत. त्याचप्रमाणे रोजगार विभागही त्यांच्याकडे आहे. पुरुषोत्तम रुपाला राज्यसभेची ही तिसरी टर्म. मत्स्य, पशुसंवर्धनमंत्री आहेत. गुजरातमधून लोकसभेचे तिकीट मिळू शकते.
राजीव चंद्रशेखर मूळचे राज्यसभेचे असले तरी कर्नाटकातून राज्यसभेवर. ही तिसरी टर्म असून सध्या माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास विभागाचे राज्यमंत्री.

व्ही. मुरलीधरन
महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले मुरलीधरन मूळचे केरळचे. राज्यसभेची पहिलीच टर्म असून सध्या संसदीय कार्य राज्यमंत्री. पुन्हा राज्यसभेवर जाण्याची शक्यता.
एल. मुरुगन
माहिती व प्रसारण राज्यमंत्री असलेले मुरुगन मध्य प्रदेशातून राज्यसभेवर. पहिलीच टर्म असून तमिळनाडूतून लोकसभा लढवू शकतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.