Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आर्मी ऑफिसर आणि डॉक्टर जोडप्याची भन्नाट लग्नपत्रिका; फोटो पाहून तुम्हीही कौतुक कराल

आर्मी ऑफिसर आणि डॉक्टर जोडप्याची भन्नाट लग्नपत्रिका; फोटो पाहून तुम्हीही कौतुक कराल


लग्न ही प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. प्रत्येकजण आपल्या लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. कधी कोणी ढोल-ताशाच्या तालावर एन्ट्री घेत तर कधी घोड्यावरुन एन्ट्री घेतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अनेकजण लग्नाची हटके लग्नपत्रिका बनवतात. असाच एका लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोवरुन एका फौजी आणि डॉक्टरचे लग्न होणार असल्याचे दिसत आहे. त्यासाठी अनोख्या डिझाइनची लग्नपत्रिका तयार करण्यात आली आहे. लग्नपत्रिकेत एका बाजूची रचना सैनिकांच्या शर्टाप्रमाणे करण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला डॉक्टरचा पांढऱ्या रंगाचा युनिफॉर्म असल्याचे दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या लग्नपत्रिकेत डिझाइनरची क्रिएटिव्हीटी दिसत आहे. त्यावर सैनिकांची युनिफॉर्म असलेल्या बाजूला वराचे नाव तर डॉक्टरांचा युनिफॉर्म असलेल्या बाजूला वधूचे नाव लिहण्यात आले आहे. वराचे नाव अदनान आहे तर वधूचे नाव डॉ. रमशा असे आहे. या लग्नपत्रिकेचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.