Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बायकोनेच दाखल केला नवऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, नवऱ्याला अटक

बायकोनेच दाखल केला नवऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, नवऱ्याला अटक


एका महिलेने आपल्याच नवऱ्यावर अॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद नोंदविण्याचा आनोखा प्रकार पंढरपुरात घडला आहे. न्यायालयीन इतिहासात बायकोकडून स्वतःच्या नवऱ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.

आंतरजातीय विवाह केलेल्या संबंधित नवरा-बायकोमध्ये बेबनाव झाल्यानंतर त्याचे लोन चक्क अॅट्रॉसिटी कायद्याखाली नवऱ्याविरूध्द फिर्याद नोंदवून त्याच्या अटकेपर्यंत पोहोचले आहे. या अनोख्या खटल्याची माहिती अशी की फिर्यादी आणि आरोपी यांचा प्रेम विवाह झाला होता. फिर्यादी दलित समाजातील तर आरोपी सवर्ण समाजातील असल्याची माहिती आहे. वैवाहिक आयुष्यात त्यांच्या पोटी दोन मुलीही जन्माला आल्या.

अलिकडे काही दिवसांपासून नवऱ्याकडून आपणास जातीवरून अपमानास्पद आणि हीन वागणूक दिली जाते, नवऱ्याने आपल्या इच्छेविरूद्ध लैंगिक अत्याचारही केला, अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित बायकोने नोंदविली. त्यानुसार नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह भारतीय दंड संविधान कलमान्वये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी नवऱ्यास अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.